Badlapur School Case प्रकरणात उद्धव ठाकरेंनी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणे अशोभनीय; देवेंद्र फडणवीस यांचे मत

179
विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्ये (Badlapur School Case) देखील केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करण हे त्यांना शोभत नाही. किंवा अशा प्रकारच्या घटना ज्या वेळी घडतात त्यावेळी अशा मोठ्या पदावरील व्यक्तीने राजकीय न वागता जनतेला काय दिलासा देता येईल. न्याय कसा मिळून देता येईल. अशा प्रकारचे वागायचे असते. अशा प्रकारच्या सूचना करायच्या असतात. मात्र, सुप्रियाताई आणि उद्धव ठाकरे यांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यांना जनतेशी काही देणे घेणे नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. तर आरोपी हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संवेदनहीन किंवा ज्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, अशा पद्धतीचा सध्याचा विरोधी पक्ष आहे. अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळी राजकारण करायचे नसते. मात्र, यांच्या मनात दुसरे काही नाही तर केवळ राजकारण आहे. ते राजकारण आता मनातून बाहेर येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. (Badlapur School Case)

आता आमचे लक्ष केवळ कायदा आणि सुव्यवस्था कशी नीट राखता येईल, याकडे आहे. आमच्यासाठी ते महत्त्वाचे आहे. मुलीच्या कुटुंबीयांना न्याय कसा आणि कधी देता येईल. याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि मी स्वतः सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. त्या संदर्भात योग्य आणि संवेदनशीलतेने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्ये (Badlapur School Case) देखील केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करण हे त्यांना शोभत नाही. किंवा अशा प्रकारच्या घटना ज्या वेळी घडतात त्यावेळी अशा मोठ्या पदावरील व्यक्तीने राजकीय न वागता जनतेला काय दिलासा देता येईल. न्याय कसा मिळून देता येईल. अशा प्रकारचे वागायचे असते. अशा प्रकारच्या सूचना करायच्या असतात. मात्र, सुप्रियाताई आणि उद्धव ठाकरे यांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यांना जनतेशी काही देणे घेणे नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. तर आरोपी हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संवेदनहीन किंवा ज्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, अशा पद्धतीचा सध्याचा विरोधी पक्ष आहे. अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळी राजकारण करायचे नसते. मात्र, यांच्या मनात दुसरे काही नाही तर केवळ राजकारण आहे. ते राजकारण आता मनातून बाहेर येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. (Badlapur School Case)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.