बारामतीतील शेतीचे तंत्रज्ञान पाहिल्यानंतर, मलासुद्धा शेतकरी व्हावे, असे वाटत आहे, असं तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले. कोकण विभागासाठी येथील माशांची शेती तसेच बांबू उत्पादनापासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू उपयोगाच्या आहेत. बारामती येथे सुरू असलेल्या, कृषी सप्ताहास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
प्रयत्न करु
अॅग्रीकल्चरलमधील तांत्रिक गोष्टी माझ्या विभागाकडे बसतील का? शेती शिक्षणाबाबत उच्च तंत्रशिक्षणामध्ये काही तरतुदी करता येतील का? याबाबत आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
( हेही वाचा :पुण्यातील हल्ल्यावर किरीट सोमय्यांनी काय दिली धमकी? )
ताण कमी होईल का?
सामंत म्हणाले, १२ वी आणि सिईटीबाबत आम्ही एक समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आला आहे. यामध्ये १२ वीचे गुण आणि सिईटीचे गुण ५० – ५० टक्के करता येतील का? यावर सध्या चर्चा सुरू आहे. लवकच याबाबत निर्णय होईल. त्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांवर असलेला सिईटीचा ताण कमी करता येऊ शकेल. कोरोनाच्या संकटतून आपण बाहेर पडत आहोत.
Join Our WhatsApp Community