आजारपण उद्धव ठाकरेंचं आणि मनोहर पर्रीकर यांचं…

130

माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरेंना उदंड आयुष्य लाभावं. उद्धव ठाकरे आजारी आहेत, असं ते स्वतःच बर्‍याचदा म्हणत असतात. आजारी असताना देखील ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. पण मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी कामे केली असती, तर आजारी असूनही कामे केली असं कौतुक नक्कीच झालं असतं.

उद्धव ठाकरे आपल्या मुलाखतीत म्हणतात की, मला अनेकदा बेस्ट सीएम म्हटलं गेलं, ते कसं काय? माणसाने जगाला फसवावं, पण स्वतःला कधीच फसवू नये. कोणत्या तरी कंपनीला कॉंट्रॅक्ट देऊन आपणंच बेस्ट सीएम आहोत, असं म्हटल्याने लोकांना खरं वाटणार आहे, असं जर ठाकरेंना वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे.

मुख्यमंत्री पदावर बसणाऱ्यासाठी आजारपण दुय्यम ठरते 

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा मुख्यमंत्रीपद स्वीकारता, तेव्हाच तुमचं आजारपण दुय्यम ठरतं. कारण त्या खुर्चीत कर्तृत्ववान माणूस बसू शकतो. ज्याला कर्म करायचं नाही त्याच्यासाठी ती खुर्ची नाही. म्हणून मी आजारी आहे, आजारी आहे असं सांगण्यात अर्थ नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मंत्रालयात किती वेळा हजेरी लावली? याला उत्तर म्हणून कोरोना काळात मी सर्वांना घरी बसण्याचं आवाहन केलं आणि मीही घरी बसलो, असं लाज आणणारं वक्तव्य ते करतात. ठाकरे कुळाला अशी भाषा शोभून दिसत नाही. ठाकरे हा शब्द उच्चारल्यावर आपल्यासमोर प्रबोधनकार आणि बाळासाहेब उभे राहतात. त्यांच्या जागी हे दोन्ही नेते असते तर ते घरात बसून राहिले नसते.

जनतेसाठी झटणारे पर्रीकर 

आजारपणाचं उदाहरण घ्यायचं असेल तर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे उदाहरण समोर ठेवावं लागेल. आजारी असताना देखील ते मंत्रालयात जात होते, रस्त्यावर उतरुन काम करत होते. मी आजारी आहे म्हणून सहानुभूती मिळवण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. कर्मयोगी प्रमाणे ते काम करत राहिले. घरी बसले नाहीत. अशा महत्वाच्या खुर्चीवर बसल्यावर त्तुमच्याकडे दोनच पर्याय असतात. काम करा किंवा खुर्ची रिकामी करा. काम करायचं नाही आणि खुर्चीही सोडायची नाही, असं देशात पहिल्यांदाच घडलं. त्यामुळे आजारपणाचा बाऊ करुन चालणार नाही. आज पर्रीकर आपल्यात नाही, पण त्यांचं जीवंत उदाहरण आपल्या समोर आहे. जनतेसाठी अविरत झटणारे पर्रीकर कुठे आणि जनतेला वार्‍यावर टाकणारे ठाकरे कुठे…
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.