पंतप्रधानांसमोरच राज्यपालांनी जाहीरपणे मांडले राज्य सरकारचे रिपोर्ट कार्ड!

143

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आजवरच्या राज्यपालांच्या तुलनेत निराळे आहेत. ते स्वतःच्या अधिकारांचा पुरेपूर वापर करत असल्यामुळे एकार्थाने राज्यात समांतर सत्ता चालवली जात आहे, असा आरोप अनेकदा सरकारमधील मंत्र्यांनी केला आहे. बुधवारी, १४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजभवनात क्रांतिकारकांची गाथा संग्रहालयाचे उदघाटन करण्यासाठी आले, त्यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चक्क राज्य सरकारचे रिपोर्ट कार्डच मांडले, विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

राज्यात ३०-४० वर्षांपासून सिंचन योजना रखडल्या 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादमधील पाणी समस्येचाही उल्लेख केला. राज्यात ३०-४० वर्षांपासून सिंचन योजना अर्धवट आहेत. काही योजना गेल्या 40 वर्षांपासून काम सुरू आहे. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. पैसा खर्च केला जात आहे. औरंगाबाद शहरात पाण्याची तीव्र टंचाई आहे. लोकांना ७ दिवसांपासून पाणी मिळत नाही. त्यामुळे अरुण जेटली म्हणायचे मोदी है तो मुमकीन आहे. मी आता आठ वर्षांनंतर म्हणतो मोदी है तो मुमकीन आहे, पंतप्रधान मोदी यांनी या योजना पूर्ण कराव्यात, जर या योजना पूर्ण होतील तर मी इथे आल्याचे सार्थक झाल्याचे मला वाटेल, असेही राज्यपाल म्हणाले.

(हेही वाचा सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, हीच संत तुकाराम महाराजांची शिकवण! पंतप्रधान मोदींनी वारकरी बांधवांना केले नमन)

माझी महाराष्ट्रात येण्याची ईच्छा नव्हती, पण… 

‘माझी इथे येण्याची इच्छा नव्हती. मी आता आराम करावा, मी आता म्हातारा झालो आहे, असे पंतप्रधानांना सांगितले होते. पण प्रेम आणि स्नेह असल्यामुळे पंतप्रधानांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी इथे आलो, असेही राज्यपाल म्हणाले. ‘मला लोक विचारतात महाराष्ट्र तुम्हाला कसा वाटतो, तर महाराष्ट्र हा मला हिमालयासारखा वाटतो. मी उत्तराखंडमध्ये जातो पण तिथे समुद्र नाही. इथे सगळे काही आहे पण हिमालय नाही. पण अत्यंत सुंदर प्रदेश आहे. महाराष्ट्रासारखा सुंदर प्रदेश नाही, असेही राज्यपाल म्हणाले.

…म्हणून राजभवनातून कुत्रे-मांजर हलवले 

राजभवनात शंभराहून अधिक अभ्यंगत येत असतात त्यांना राजभवन पाहायची ईच्छा असते, इथे राजभवनात मोर असायचे, पण कुत्रे-मांजरे येथील मोरे खायचे, म्हणून येथील कुत्रे – मांजरांना योग्य ठिकाणी हलवले आहे. आता मोर व्यवस्थित राहत आहेत. राजभवन हे लोकभवन व्हावे अशी आपली ईच्छा आहे. कोविड काळात मी बरेच काम केले, लोक त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडे येत असत. विद्यापीठांच्या कुलपतीच्या नात्याने विविध विद्यापीठांच्या दीक्षांत समारंभात हजर राहिलो, तेव्हा सगळे इंग्रजी भाषेत बोलत होते. मी सूत्रसंचालन आणि भाषणही मराठीत करण्यास सांगितले. अनेक विद्यापीठाने परदेशातील विद्यापीठाशी एमओएम केला आहे, त्यामुळे पदवी आदानप्रदान होईल. दीड वर्षांत २३ हजार जणांची घरे नियमित केली आहेत. आदिवासी पाड्यातील बांबूने बनवलेल्या राख्या महाविद्यालयात जातील, २ वर्षांपासून विकास महामंडळे बनली नाहीत, असेही राज्यपाल म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.