‘हत्येचा कट असून पडळकरांना संपवण्याचा प्रयत्न सुरू’, विधानसभेत फडणवीस आक्रमक

117

भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. हा व्हिडिओ 7 नोव्हेंबर 2021 असल्याचा दावा केला आहे. तो व्हिडिओ आटपाडी पोलिस ठाण्याच्या दारातला असून तिथे माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. तो हल्ला सुनियोजित असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत विधानसभेच्या अधिवेशनाचा चौथा दिवस असून गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पडळकर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

(हेही वाचा – ‘शिवरायांच्या पुतळ्याला पाय लावला नाही, दम असेल तर…’, वडेट्टीवार संतापले; उपाध्येना दिलं खुलं आव्हान)

यावेळी फडणवीसांनी खळबळजनक आरोप करताना असे म्हटले की, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून गोपीचंद पडळकरांच्या हत्येचा कट केला आहे. या घटनेत गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रम्हांनंद पडळकर यांच्यावरचं 307 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पडळकर यांच्यावर भादंवि 307 नुसार गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्या अधिकाऱ्याची बदली करावी अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेत्याने केली. पडळकरांच्या हल्ल्यात थेट सरकारचा संबंध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

काय आहे प्रकरण

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून नोव्हेंबर महिन्यात आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्याच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांच्या पायाला इजा झाली. पडळकर यांच्या गाडीने आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केला होता. आटपाडी पोलीस स्टेशन जवळील साठे चौकात ही घटना घडली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावावरून हा वाद सुरू झाला होता आणि तो विकोपाला गेला.

हत्येचा कट पोलिस संरक्षणात

आपली गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचे स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगाने डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचे चित्रीकरण पोलिस करताना बघायला मिळतात. हा सगळा कट पोलिस सरंक्षणात घडवून आणला जात आहे. सदर घटना थांबवण्याचऐवजी पोलिस चित्रीकरणात मग्न होते, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.