मुंबईतील हिंदूंच्या रक्षणासाठी नितेश राणे उतरणार रस्त्यावर!

जे बांगलादेशात घडले तेच पुढे मुंबईत घडणार आहे. त्यातील मालवणी हा सध्याचा पहिला भाग आहे, असे नितेश राणे म्हणाले.

140
सध्या बांगलादेशातील हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु आहेत. त्या ठिकाणी मुसलमानांकडून अल्पसंख्यांक हिंदूंवर हल्ले होतात, अत्याचार होत आहेत. या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. या घटनांचा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुंबईशी जोडला आहे. त्यामुळे आम्ही मुंबईतील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहोत, असे राणे यांनी जाहीर केले आहे.

काय म्हटले नितेश राणे यांनी? 

बांगलादेशात नुकतेच नवरात्रीच्या काळात थेट दुर्गा देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. मंदिराची तोडफोड करण्यात आली. मंदिरातील पुजाऱ्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर लगेच मुसलमानांनी येथील हिंदूंच्या वस्तीवर हल्ला केला. त्यामुळे येथे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा संदर्भ देत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले. त्यामध्ये आमदार राणे म्हणाले की, जे बांगलादेशात घडले तेच पुढे मुंबईत घडणार आहे. त्यातील मालवणी हा सध्याचा पहिला भाग आहे. अशा प्रकारे मुंबईत अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. आम्ही अशा ठिकाणांना भेटी देणार आहोत, तेथील हिंदूंना पाठिंबा देणार आहोत. येत्या आठवड्यात आम्ही हे कार्य सुरु करणार आहोत. बंगाल पॅटर्नवरील मुख्यमंत्र्यांचे प्रेम आणि उघडकीस आणणार आहोत.

अस्लम शेख लक्ष्य! 

नितेश राणे यांनी त्याच्या ट्विटमध्ये मालवणी भागाचा उल्लेख केला आहे. मालवणी हा भाग मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा मतदार संघ आहे. मध्यंतरी येथे मुसलमानांनी काही हिंदूंना त्रास दिल्याने त्यांनी घरे सोडून तेथून पलायन केल्याच्या घटना घडल्या होत्या. हा भाग मुस्लिम बहुल बनल्याने इथे हिंदूंना असुरक्षित वाटत असल्याची चर्चा सुरु आहे. तेव्हापासून मुंबईत मुस्लिम बहुल भागात हिंदूंच्या सुरक्षेचा विषय चर्चेला आला होता. आता नितेश राणे यांनी मालवणी भागाला थेट बांगलादेशाशी जोडला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.