नाशिक येथे कोठे गल्ली येथे २५ वर्षांपासून एक अनधिकृत दर्गा (Dargah) उभारण्यात आला होता. त्याविरोधात हिंदुत्वनिष्ठांनी वारंवार विरोध प्रकट केला होता, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत होते, अखेर हिंदुत्वनिष्ठ, संत आणि महंत यांनी या विरोधात प्रखर आंदोलनाचा इशारा दिल्यावर महापालिका प्रशासनाने अखेर शनिवार, २२ फेब्रुवारीला या दर्ग्यावर कारवाई केली. हा दर्गा (Dargah) जमीनदोस्त केला.
नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात सुमारे २५ वर्षांपूर्वी हा दर्गा उभारण्यात आला होता. मात्र हा दर्गा (Dargah) बेकायदेशीर असल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठ करत होते. या दर्ग्यावर तोडक कारवाई करावी, अशी मागणी अलीकडे जोर धरू लागली होती. यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ, संत, महंत एकवटले आणि त्यांनी शनिवारी या दर्ग्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नाशिक महापालिका प्रशासन सतर्क झाले आणि आंदोलनाच्या आधीच त्यांनी हा दर्गा (Dargah) जमीनदोस्त करण्याची करवाई सुरु केली. आंदोलनापूर्वी नाशिक पोलिसांकडून आंदोलन स्थळी येणाऱ्या हिंदुत्वनिष्ठ, संत आणि महंत यांना ताब्यात घेतले. नाशिकच्या याच काठेगल्ली द्वारका भागात आलेल्या काही आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतले.
महंत सुधीरदास महाराज आणि महंत अनिकेतशास्त्री महाराज नजरकैदेत
शनिवारी सकाळपासून प्रशासनाने एकीकडे प्रशासनाकडून कारवाई केली जात असताना, दुसरीकडे हिंदू समाज आक्रमक झाला. त्यांनी अनधिकृत दर्गा (Dargah) परिसरात एकत्र जमायला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी हिंदू साधू महंतावर कारवाई केली असून आंदोलनात सहभागी होणाऱ्या आणि आंदोलनाला पाठबळ देणाऱ्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, तसेच महंत सुधीरदास महाराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर महंत अनिकेत शास्त्री महाराज यांना पोलिसांच्या नजर कैदेत ठेवले.
महंत अनिकेत शास्त्री महाराज यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. (Dargah)
Join Our WhatsApp Community