Maharashtra Assembly Election Result 2024: उत्तर महाराष्ट्रात मविआचा सुपडा साफ; भाजपाला घवघवीत यश!

62
Maharashtra Assembly Election Result 2024: उत्तर महाराष्ट्रात मविआचा सुपडा साफ; भाजपाला घवघवीत यश!
Maharashtra Assembly Election Result 2024: उत्तर महाराष्ट्रात मविआचा सुपडा साफ; भाजपाला घवघवीत यश!

उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) 47 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले असून 18 जागांवरती भाजपला (BJP) विजय मिळाला आहे. निवडणुकीमध्ये शिंदे यांची शिवसेना (Shiv Sena) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी उत्तर महाराष्ट्र मध्ये दमदार यश घेऊन पुढे जाताना दिसून येत आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: अजित पवारांच्या बंगल्यावर विजयाचा उत्साह साजरा   )

उत्तर महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आत्तापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांची प्रगती ही सातत्याने होत होती. विशेष करून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार हे जिल्हे नेहमीच काँग्रेस आणि नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे उभी राहिली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दुभागली आणि शिवसेना देखील दुभंगली. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचे चित्र काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष होते, पण या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळ चित्र उभं राहिलं आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले. (Maharashtra Assembly Election Result 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?)

नाशिक (Nashik) , धुळे (Dhule), जळगाव (Jalgaon), नंदुरबार (Nandurbar) आणि अहमदनगर (Ahmednagar) या जिल्ह्यांमध्ये भाजपला मिळालेले यश हे नक्कीच वाकण्याजोगे आहे, पण त्याचबरोबरने नव्याने उदयास आलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे देखील दमदार पदार्पण झाले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये भाजपला पाच, शिंदे शिवसेनेला दोन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सहा जागा मिळाल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजपला दोन जागा मिळाल्या. (Maharashtra Assembly Election Result 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीसांचा विजयानंतर पुन्हा एकदा एक हैं तो ‘सेफ’ हैं! चा नारा!)

धुळे जिल्ह्यामध्ये भाजपला चार जागा मिळवल्या तर शिवसेना शिंदे गटाला एक जागा मिळाली आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे दमदार पदार्पण झाले आहे. जळगावमध्ये भाजपला पाच, शिवसेना शिंदे गटाला पाच आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये भाजपला तीन, शिवसेना शिंदे यांच्या गटाला दोन, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला चार, काँग्रेसला एक, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.