Lok Sabha Election : ओडिशात BJP-BJD ची युती; १५ वर्षांनंतर पुनर्मिलन

दोन्ही पक्षांमध्ये औपचारिक चर्चा झाली असली तर युतीची घोषणा अद्याप झालेली नाही. ही घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

250
Lok Sabha Election 2024 : ... तरीही काही राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रतिक्षेत

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ओडिशात भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांची युती होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये औपचारिक चर्चा झाली असली तर युतीची घोषणा अद्याप झालेली नाही. ही घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election)

लोकसभेच्या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा जिंकून आणण्याच्या योजनेला यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष योजनाबद्ध पध्दतीने रणनिती आखत आहे. भाजपाने आता ओडिशात बिजू जनता दलाशी युती करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. दोन्ही पक्षांमध्ये औपचारिक चर्चा झाली आहे. लवकरच युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election)

भाजपला १४ जागा हव्यात

ओडिशामध्ये लोकसभेच्या २१ जागा आहेत. सध्या बीजेडीकडे १२, भाजपाकडे आठ आणि काँग्रेसकडे एक जागा आहे. भाजपाची ओडिशात आठपेक्षा जास्त जागा लढविण्याची इच्छा आहे. यासाठी भाजपाने बीजेडीकडे १४ जागांची मागणी केली आहे. दोन्ही पक्षांची युती झाल्यानंतर भाजपाला आणखी पाच-सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election)

विधानसभेच्या निवडणुकीत भरपाई होणार

बिजू जनता दलाने भाजपाला जादा जागा दिल्या तर याची भरपाई विधानसभेच्या निवडणुकीत केली जाणार आहे. भाजपाने १४ जागा आणि बीजेडीने सात जागा लढवाव्या अशी भाजपाचा प्रस्ताव आहे. या बदल्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाकडून बीजेडीला आणखी जागा देऊ शकतात. (Lok Sabha Election)

ओडिशातील भाजप नेत्यांची हायकमांडशी चर्चा

ओडिशातील भाजपाच्या नेत्यांनी बुधवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्याच दिवशी बीजेडी नेत्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही पक्षांमधील युतीची औपचारिक घोषणा होऊ शकते. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – PM Narendra Modi : या नवीन जम्मू – काश्मीरची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती)

१५ वर्षांनंतर दोन्ही पक्षांचे पुनर्मिलन होणार का? 

बीजेडी उपाध्यक्ष आमदार देबी प्रसाद मिश्रा भाजपासोबत संभाव्य युतीबाबत बोलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या ओडिशा दौऱ्यात दोन्ही पक्ष १५ वर्षानंतर पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते. महत्वाचे म्हणजे, ओडिशातील नवीन पटनायक सरकारच्या विरोधात पंतप्रधान मोदी काहीही बोलले नाहीत, तर पंतप्रधानांनी अनेक प्रसंगी नवीन पटनायक यांचे कौतुकही केले. (Lok Sabha Election)

विशेष म्हणजे युतीची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये युती झाली तर जागावाटपाबाबत राज्यातील समीकरण काय असेल? हाही प्रश्न आहे. जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी होणार का? असे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु, बीजेडीने अलिकडच्या काळात भाजपाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे असे संसदेत अनेकवेळा दिसून आले आहे. यामुळे युतीचा निर्णय सहज होईल, असे चित्र आहे. (Lok Sabha Election)

भजप बीजेडीसाठी ९७ जागा सोडणार

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने जादा जागा लढविल्या तर विधानसभा निवडणुकीत बीजेडी जास्त जागा लढविणार असा भाजपाचा प्रस्ताव आहे. सध्या जी चर्चा रंगली आहे ती अशी की, विधानसभेच्या निवडणुकीत बीजेडी ९५-९७ जागा लढविणार. उर्वरित ५०-५२ जागा भाजपा लढविणार. बीजेडीला मोठा वाटा हवा आहे कारण सध्या दोन्ही सभागृहात त्यांची संख्या जास्त आहे. बीजेडीला विधानसभेच्या १०२ पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. ओडिशात विधानसभेच्या १४७ जागा आहेत. (Lok Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.