रामनगरी अयोध्या 18 लाख पणत्यांसह विश्वविक्रमासाठी सज्ज, कसा असणार अयोध्येतील ‘दीपोत्सव’

153

दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनगरी अयोध्या दीपोत्सवासाठी सज्ज झाल्याचे दिसतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दीपोत्सवाचा एक भाग म्हणून आज (रविवार) प्रभू रामाची अयोध्या आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार करणार आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यात म्हणजेच रामजन्मभूमीवर साधारण 18 लाख मातीचे दिवे लावण्याची तयारी पूर्ण झाली आहे. दिपावलीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या कार्यक्रमाची भव्य व्यवस्थाही करण्यात आली आहे. सलग सहाव्या वर्षी अयोध्येच्या दीपोत्सवाच्या नावावर आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद होणार आहे.

अयोध्या नगरीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. रविवारी म्हणजे आज अयोध्येमध्ये दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मोदी यांच्या उपस्थितीत दीपोत्सवादरम्यान फटाके, लेझर शो आणि रामलीला रंगणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरयू किनार्‍यावरील राम की पैडी येथे भव्य संगीत लेझर शोसह 3-डी होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शोचे साक्षीदार होतील.

(हेही वाचा – सोनिया गांधींना मोठा धक्का, राजीव गांधी फाउंडेशनवर केंद्र सरकारकडून कारवाई)

22 हजारांहून अधिक स्वयंसेवक सरयूच्या किनारी राम की पैडी येथे 15 लाख मातीचे दिवे लावतील. उर्वरित महत्त्वाच्या चौक आणि इतर ठिकाणीही दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. स्वयंसेवक एका चौकात 256 मातीचे दिवे लावतील आणि दोन चौकांमधील अंतर सुमारे दोन ते तीन फूट असेल. लेझर शो, थ्रीडी प्रोजेक्शन मॅपिंग शो आणि फटाक्यांची अतिषबाजी देखील असणार आहे. यासह वाळूंचे शिल्प देखील साकारले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.