रायगडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; नगराध्यक्षांसह ३४ सरपंच भाजपात दाखल

142

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच भाजपाने राष्ट्रवादीला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी पालीच्या नगराध्यक्षांसह रायगडमधील ३४ सरपंच राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपाप्रवेश झाला.

( हेही वाचा : shraddha murder case : पॉलिग्राफी टेस्ट करायला आलेल्या आफताबचे तुकडे करण्यासाठी नाचल्या तलवारी आणि…)

पालीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा यांच्यासह ३४ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह, ३ नगरसेवकांचा यात समावेश आहे. या सर्वांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यामध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढली आहे. रायगडमध्ये भाजपा पक्ष एक नंबरचा कसा होईल, यासाठी हे सर्वजण प्रयत्नशील राहतील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

आज भाजपात आलेली ही सर्व मंडळी त्या-त्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षे चांगले काम करीत आहेत. गीता पालरेचा या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पालीच्या नगराध्यक्षा होत्या. परंतु त्यांनी आपल्या पक्षाचा व पदाचा त्याग करून भाजपामध्ये प्रवेश केला. मोठ्या पदावर विराजमान असलेली व्यक्ती सहसा पद सोडत नाही. परंतु, गीता पालरेचा यांनी कार्यकर्त्यांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेच्या हिताचे सरकार या महाराष्ट्रामध्ये विराजमान झालेले आहे. त्यामुळे सुधागड तालुक्यामधील सर्व प्रश्न अर्थाने मार्गी लावण्यासाठी या प्रवाहामध्ये त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विश्वास दाखवून विकासाच्या दिशेने हा प्रवास सुरू केल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.