Rajasthan मध्ये हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या मुसलमानांचे धाबे दणाणले; सरकारने बुलडोझर फिरवण्यास केली सुरुवात

भिलवाडा येथील शांतता बिघडवण्याचा मुसलमांनानी कट रचल्यानंतर प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शनिवारी प्रशासनाने बेकायदा बांधकामांवर बुलडोझरचा वापर केला.

397

राजस्थानातील (Rajasthan) शाहपुरा येथील हिंदू देवतांच्या मिरवणुकीवर दगडफेकीनंतर राज्य सरकारच्या आदेशाने स्थानिक प्रशासनाने बुलडोझरची कारवाई सुरू केली आहे. या मशिदीतून दगड फेकण्यात आले, आता ती मशीद अधिकृत आहे की अनधिकृत याची शहनिशा करणे सुरू झाले आहे. त्यानुसार कागदपत्रे मागावण्यात आली आहेत. त्यात काही त्रुटी आढळल्यास मशिदीवर बुलडोजर फिरवण्यात येणार आहे.

प्रशासनाच्या या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. भिलवाडा येथील शांतता बिघडवण्याचा मुसलमांनानी कट रचल्यानंतर प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शनिवारी प्रशासनाने बेकायदा बांधकामांवर बुलडोझरचा वापर केला. पोलिसांच्या उपस्थितीत प्रशासनाने अनेक बेकायदा दुकाने जमीनदोस्त केली आणि अनेक बेकायदेशीर केबिन पाडल्या. प्रशासन हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत असताना संतप्त नागरिक मशिदीवर बुलडोझर चालवण्याची मागणी करत आहेत. शाहपुरा जहाजपूर नगरपालिकेने (Rajasthan) जहाजपूर येथील जामा मशिदीकडून मालकी हक्काच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. पालिकेने २४ तासांत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली आहे. पालिकेने सदर जामा मशीद समितीला नोटीस बजावून इमारतीची कागदपत्रे मागवली आहेत. लीज आणि बांधकाम मंजुरीची कागदपत्रे २४ तासांच्या आत सादर करावी लागणार आहेत. तसे न केल्यास कारवाई केली जाऊ शकते.

(हेही वाचा Dnyanesh Maharao यांच्या विरोधात राजगुरुनगरमध्ये हिंदू उतरले रस्त्यावर)

भीलवाडामध्ये काय झाले? 

(Rajasthan) शाहपुरा येथील जहाजपूर येथे जलझुलानी एकादशीनिमित्त प्रभूची मिरवणूक काढण्यात येत होती. भाविकांचा जमाव रस्त्यावरून बेवन घेऊन नाचत, गात होता. राजस्थानमध्ये लाकडी सिंहासनाला बेवन म्हणतात. ज्यावर चारभुजनाथाची मूर्ती आहे. भगवानच्या बेवांना जहाजपूर शहरातील किल्ल्यासह सर्व मंदिरांमधून भंवर कला तलावात स्नानासाठी नेले जाते आणि रात्री उशिरापर्यंत ते आपापल्या मंदिरात परत जातात. परमेश्वराची धार्मिक मिरवणूक निघत असताना मशिदीसमोरून जात असताना तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही पक्ष समोरासमोर आले आणि काही वेळातच मिरवणुकीवर दगडफेक झाली.

भाजप आमदार आक्रमक 

पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक आणि गोंधळानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. ही बातमी भाजपचे आमदार गोपीचंद मीना यांना समजताच तेही तेथे पोहोचले आणि जोपर्यंत दगडफेकीतील आरोपींची ओळख पटत नाही, त्यांना अटक करणार नाही, तोपर्यंत धरणे धरणार, अशी घोषणा त्यांनी केली. त्यानंतर प्रशासनाने दगडफेक करणाऱ्यांचे बेकायदेशीर बांधकाम बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात येईल, अशी घोषणा केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.