सहा महिन्यांनी देशात मोठा राजकीय भूकंप होईल; PM Narendra Modi यांचा दावा

बंगालमधील तृणमूल सरकार काही ठराविक लोकांच्या तुष्टीकरणासाठी संविधानावर हल्ला करत आहे. आपल्या संविधानाने दलितांना आणि मागासवर्गीयांना आरक्षण दिले आहे. मात्र बंगालमध्ये त्या आरक्षणावर दरोडा टाकण्यात आला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

266

तुमचे एक मत देशाची दिशा बदलू शकते. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यानंतर सहा महिन्यांनी देशात एक मोठा राजकीय भूकंप होईल. घराणेशाहीचे राजकारण घेऊन पुढे चाललेले अनेक पक्ष नष्ट होतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभेत बोलताना केला.

तृणमूल कॉँग्रेसवर हल्लाबोल  

तृणमूल काँग्रेसने बंगालला विकासापासून वंचित ठेवले आहे. लोकांनाही आता जाणीव झाली आहे की, पूर्ण ईमानदारीने देशाचा विकास कोणी करू शकत असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे मी बंगालमधील मतदारांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या राज्यात भाजपाला मजबूत करा, त्यानंतर भाजपा तुमची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करेल, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

(हेही वाचा Pune Porsche Accident: ‘बाळा’ची आई घरातून बेपत्ता; पोलिस घरी पोहोचल्यावर मिळालं वेगळंच उत्तर!)

बंगालमधील तृणमूल सरकार काही ठराविक लोकांच्या तुष्टीकरणासाठी संविधानावर हल्ला करत आहे. आपल्या संविधानाने दलितांना आणि मागासवर्गीयांना आरक्षण दिले आहे. मात्र बंगालमध्ये त्या आरक्षणावर दरोडा टाकण्यात आला आहे. दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण लुटून ते मुसलमानांना दिले आहे. बंगालमधील सरकारने मुसलमानांना खोटी ओबीसी जातप्रमाणपत्रे देऊन त्यांचा ओबीसीत समावेश केला आहे. तुष्टीकरणासाठी हे लोक कुठपर्यंत जाऊ शकतात त्याचा एकदा विचार करा. १ जून रोजी तुम्ही दिलेले एक मत या राज्यावरील धोकादायक संकट टाळू शकते, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)  म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.