दक्षिण मुंबईत MNS ची मते ठरणार निर्णायक, मनसैनिकांचाही प्रचारात जोर

शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने दक्षिण मुंबईत मनसे पुन्हा एकदा कामाला लागली आहे.

705
दक्षिण मुंबईत MNS ची मते ठरणार निर्णायक, मनसैनिकांचाही प्रचारात जोर

शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने दक्षिण मुंबईत मनसे पुन्हा एकदा कामाला लागली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत निवडणूक न लढवणाऱ्या मनसैनिकांना कुणाला मतदान करावे याबाबत संभ्रम निर्माण झाले होते. परंतु यावेळी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने मनसैनिकांना महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे स्पष्ट निर्देशच प्राप्त झाले आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांच्यासाठी मनसेची ही मते निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे मताधिक्यांची मते ही मनसेचीच असतील असे शक्यता वर्तवली जात आहे. (MNS)

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात वरळी, शिवडी, भायखळा, मलबारहिल, मुंबादेवी, कुलाबा हे सहा विधानसभा मतदार संघ येत असून त्यातील वरळी आणि शिवडीमध्ये सुमारे ३५ ते ३८ हजार एवढी मनसेची मते आहे. तर भायखळ्यात सुमारे २० हजार आणि मलबारहिलमध्ये सुमारे १० हजार एवढी मते आणि कुलाबा पाच हजारत तसेच मलबारहिमध्येही ३ ते ४ हजार एवढी मते आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत मनसेची किमान लाख मतांची व्होट बँक असून कुणाही उमेदवाराला उभे केल्यास एवढी मते शंभर टक्के पडली जात आहे. (MNS)

(हेही वाचा – North Mumbai LS Constituency : अस्लम शेख यांचा उत्तर मुंबई ऐवजी उत्तर मध्य मुंबईतच प्रचार)

मनसेची मते महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी निर्णायक 

मागील निवडणुकीत मनसेची ही मते शिवसेना भाजपाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या पारड्यात पडली होती. परंतु आता दोन शिवसेना असून शिवसेना पक्ष हा भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुतीत तर उबाठा शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह महाविकास आघाडीत सामील झाले आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव आणि उबाठा शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या लढत आहे. त्यामुळे मागील वेळेला सावंत यांना मतदान करणाऱ्या मनसैनिकांची मते आता महायुतीचा उमेदवार असलेल्या यामिनी जाधव यांच्या बाजुने जाणार आहे. आणि त्यासाठी मनसेचे नेते तसेच दक्षिण मुंबईतील विभाग अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारी काम करताना दिसत आहेत. (MNS)

मात्र, शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडून नेल्यानंतर आता उबाठा शिवसेनेच्या विरोधात मनसैनिकांमध्ये प्रचंड राग आहे. त्यातच राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे शिवसेना नेते बाळा नांदगावकर यांच्यासह दक्षिण मुंबईतील पदाधिकारी कामाला लागले आहेत. मागील आठवड्यात मनसैनिकांचा एक मेळावा शिवडीतील राष्ट्रीय मजदूर संघाच्या सभागृहात पार पडली. या मेळाव्यात २००० हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे मनसेची ही मते महायुतीच्या उमेदवाराच्या विजयात निर्णायक ठरली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (MNS)

(हेही वाचा – Urban Voters : शहरी मतदारांना मतदानासाठी उतरविण्याचे राजकीय पक्षांसमोर आव्हान)

मनसेची एक लाखांहून अधिक मते

मनसेचे उपाध्यक्ष अरविंद गावडे यांनी राजसाहेबांनी जो आदेश दिला आहे, त्यानुसार दक्षिण मुंबईतील सर्व मनसैनिक महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचाराला लागला आहे. सर्वसाधारण मनसेची एक लाखांहून अधिक मते आहेत. पण यंदा साहेबांच्या आदेशानुसार ज्याप्रमाणे मनसैनिक प्रचाराला लागला आहे, ते पहाता मनसेची मते महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी निर्णायक ठरतील, असे त्यांनी सांगितले. तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेची दक्षिण मुंबईत एक ते सव्वा लाख मते ही फिक्स आहेत. (MNS)

आता मी स्वत: प्रचारात फिरत आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत आहे. त्यामुळे मनसेच्या एक ते सव्वा लाख मतांच्या तुलनेते २० ते २५ टक्के मतांमध्ये वाढ होईल आणि निश्चितच त्यांचा फायदा महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना होईल. त्यामुळे विजयातील मतांचा फरक जो असेल ती मनसेची मते असतील असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे दक्षिण मुंबईत महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यासाठी मनसे जिवाचे रान करत असून त्यातच मागील दोन निवडणुकीत पराभूत झालेले मुरली देवरा हेही आता शिवसेनेत असल्याने त्यांचा फायदा जाधव याना होणार आहे. त्यामुळे जाधव यांचे पारडे सावंत यांच्यापेक्षा सरस असल्याचे बोलले जात आहे. (MNS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.