शिवसेना पुन्हा म्हणणार…तरीही आम्ही हिंदुत्ववादीच! 

सध्या शिवसेनेला राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसच्या आग्रहाखातर हिंदुत्वाच्या मुद्यांना बगल द्यावी लागत आहे. असे करत असताना हळूहळू सेना विचारानेही काँग्रेसप्रमाणे होऊ लागली का, असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी घटना अमरावतीत घडली आहे. 

शिवसेना स्वतःचे हिंदुत्व किती सुरक्षित आहे, हे पटवून देण्यासाठी मागील वर्षभर भाजपाला ‘तुम्ही काश्मीरमध्ये कुणाच्या मांडीला मांडी लावून बसला होतात’, हे एकमेव उदाहरण देत एकापाठोपाठ एक हिंदुत्वविरोधी भूमिका घेत असते आणि छातीठोकपणे ‘आम्ही हिंदुत्ववादीच आहोत, आम्हाला हिंदुत्व कुणी शकवू नये’, असे सांगत असते. शिवसेनेला पुन्हा एकदा असे छातीठोकपणे सांगावे लागणार आहे. कारण सेनेने अमरावती येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीसाठी चक्क एमआयएमशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संभाजीनगरचे विरोधक! 

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण कारणार असल्याचे गर्वाने सांगणाऱ्या आणि हे नामकरण बाळासाहेबांनी आधीचे केले आहे अशी पुष्टी देणाऱ्या शिवसेनेच्या हाती सत्ता येऊन वर्ष उलटले. तरीही अजून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर केले नाही. विशेष म्हणजे त्या नामकरणालाच एमआयएमचा विरोध आहे. त्यामुळे या मुद्यावरून औरंगाबादमध्ये समोरासमोर उभी ठाकणारी सेना-एमआयएम अमरावतीत मात्र गळ्यात गळे घालत आहे. यावरून राजकीय वर्तुळात शिवसेनेच्या हिंदुत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

(हेही वाचा : कोणी बनवली शिवसेनेला टिपूची हिरवी सेना?)

असा सुरू आहे सेनेचा हिंदुत्वविरोधी प्रवास! 

दोन्ही काँग्रेससोबत महाआघाडी! 

लोकसभा आणि विधानसभा भाजपसोबत लढल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजपशी युती तोडली आणि ज्यांच्याविरोधात विधानसभा लढवली त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसोबत महाआघाडी करून सत्ता स्थापन केली. त्याआधी काँग्रेस अध्यक्ष्या सोनिया गांधी यांना ‘सरकार सर्वधर्मसमभाव, घटनेच्या चौकटीत आणि किमान समान कार्यक्रमानुसार चालेले’, असे लेखी लिहून दिले.

अयोध्येत जाणे टाळले! 

सर्वोच्च  न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहू नये, अशी भूमिका काँग्रेसने मांडल्यावर मुख्यमंत्री यांनी जाणे टाळले होते.

बाळासाहेब ‘जनाब’ झाले! 

नवीन वर्षानिमिताने शिवडी भागातील सेनेचे माजी शाखाप्रमुख सुरेश काळे यांनी शिवसेनेच्या नावाने दिनदर्शिका छापली. ती चक्क उर्दू भाषेत होती. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो घेतला. त्यामध्ये बाळासाहेबांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ ऐवजी ‘जनाब’ असा केला होता. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

नमाज पठणाच्या स्पर्धेची घोषणा! 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकेकाळचे विश्वासू शिवसैनिक शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी चक्क नमाज पठणावर स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यामुळेही शिवसेनेच्या हिंदुत्वावर पुन्हा टीकाटिप्पणी करण्यात आली. तेव्हाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी मौन बाळगले.

टिपू सुलतानची जयंती साजरी! 

मीरा-भाईंदर येथील शिवसेनेचे युवा शहर संघटक सलमान हाशमी यांनी टिपू सुलतानच्या जयंतीच्या निमिताने शुभेच्छा दिल्या होत्या. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे या सर्वांचे फोटो छापले. त्यामध्ये शिवसेनाप्रमुखांना हिरव्या रंगाचा शेला घातला होता. तेव्हाही पुन्हा एकदा शिवसेनेला टिकेला सामोरे जावे लागले, तरीही शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर एकाक्षराने याचा जाब विचारला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here