- खास प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांऐवजी महायुतीने केवळ सात जागा भरल्या. राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी नवनियुक्त विधान परिषद आमदारांचा शपथविधीदेखील महायुतीने उरकला आणि महाविकास आघाडीवर कुरघोडी केली. (Governor)
२०२० ची यादी प्रलंबित
जून २०२० मध्ये विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्या आणि त्या भरण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळात नव्या नावांची शिफारस करण्याचा निर्णय २९ ऑक्टोबर २०२० रोजी झाला. त्यानुसार नव्या १२ सदस्यांच्या नावांची यादी ६ नोव्हेंबर २०२० मध्ये राज्यपालांकडे पाठवण्यात आली, मात्र ती राज्यपालांकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिली. (Governor)
(हेही वाचा – Baba Siddique Death : बाबा सिद्दिकी हत्येशी शाहिद बलवांचा संबंध काय? शाहिद बलवा कोण आहेत?)
नव्या नावास मंजूरी आणि शपथविधीही
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने राज्यपालांकडे पाठवलेल्या नावांची यादी रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना ऊबाठा शहरप्रमुख सुनील मोदी यांनी न्यायालयात धाव घेतली मात्र न्यायालयाने या जागांबाबत कोणताही निर्णय किंवा नव्या नियुक्तीस स्थगिती दिली नाही. अखेर काल सोमवारी राज्य सरकारने सात नव्या नावांवर शिक्कामोर्तब करत मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर राज्यपालांकडे शिफारस पाठवली. त्याला तत्काळ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजूरी दिली आणि मंगळवारी दुपारी, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी, शपथविधीदेखील झाला. (Governor)
‘करेक्ट टाइमिंग’ साधत गेम
ऐनवेळी मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर, राज्यपालांची मंजूरी आणि शपथविधी घेत महायुतीने महाविकास आघाडीचा ‘करेक्ट टाइमिंग’ साधत गेम केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. महाविकास आघाडीला न्यायालयात जाण्यासाठी २४ तासाचा वेळही दिला गेला नाही. मंगळवारी महाविकास आघाडीने न्यायालयात याचिका दाखल केली मात्र त्यावर अपेक्षेप्रमाणे कोणताही निर्णय घेणे न्यायालयाला शक्य झाले नाही. दुपारी ४ वाजता आचारसंहिता जाहीर झाली त्यामुळे आता या नियुक्तीवर न्यायालयात निर्णय लागेपर्यंत आमदारकीचा कालावधी संपुष्टात येईल, असे बोलले जात आहे. (Governor)
(हेही वाचा – Election Commission : मतदार यादीत तुमचे नाव आहे का? कसे तपासाल?)
१२ ऐवजी सात का?
पण एका मुद्द्यावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे, ते म्हणजे परिषदेवर १२ जागा रिक्त असताना केवळ सातच जागा महायुतीने का भरल्या? यामागचे कारण देताना एका नेत्याने सांगितले की, १२ आमदारांच्या पूर्वीच्या शिफारशीचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने सात आमदारांच्या नियुक्तीसाठी कदाचित वेगळी याचिका नव्याने केली जाईल आणि १२ आमदार आणि ७ आमदार या दोन याचिकावर वेगळी सुनावणी होईल, यासाठी सात उमेदवारांची निवड झाली. आणि १२ मधील ६ भाजपा आणि प्रत्येकी ३-३ शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी अजित पवार असे जे वाटप होते तसेच वाटप ६ ऐवजी ३ आणि ३-३ ऐवजी दीड करता येत नाही म्हणून प्रत्येकी २-२ असे शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी यांच्यात वाटप झाले, असे सांगण्यात आले. (Governor)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community