पंतप्रधान म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत घरगुती, आयुर्वेदिक उपचार महत्वाचे!

सध्याच्या परिस्थितीत सर्दी खोकल्यावर काढा दिला जातो, त्याचा वापर या हंगामात केला पाहिजे, घरगुती उपचार, आयुर्वेदिक उपचार पद्धती महत्वाची आहे. हा वैद्यकीय उपचार म्हणून सांगत नाही तर घरगुती उपचार म्हणून सांगतोय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबतच्या ऑनलाईन चर्चेनंतर जनतेशी बोलतांना म्हणाले.

लसीकरणाबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

देशभरात कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यात निर्बंध लावण्यात आले आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधला. लसीकरणाबद्दल कोणत्याही अफवांवर आपल्याला विश्वास ठेवायचा नाही. अशा गोष्टींना टिकू द्यायचे नाही. अनेक वेळा लस घेतल्यानंतरही कोरोना होतो, मग काय फायदा आहे. मास्क घातला तरी कोरोनाची लागण होतो, याचा फायदा होत नाही, अशा अफवा पसरल्या आहे. याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा अंत्ययात्रेला २०, लग्नाला १०० जणांची उपस्थिती, ‘निकाह’ मात्र तुडुंब गर्दीत! ठाकरे सरकारचा उफराटा न्याय)

आर्थिक परिस्थितीचे नुकसान होऊ देणार नाही

भारतातील लशी जगभरात दिल्या जात आहे. 90 टक्के लोकांना पहिला डोस पूर्ण झाला आहे. दुसरा डोस 70 टक्के पूर्ण झाला आहे. लसीकरण अभियानाला वर्ष पूर्ण होण्यासाठी अजून तीन दिवसबाकी आहे. भारत आता 3 कोटी किशोरवयीन मुलांचे लसीकरण पूर्ण करत आहे.  आज राज्यांकडे लशीचा साठा उपलब्ध आहे. आरोग्य सेवकांना जितक्या लवकरच बुस्टर डोस लागेल ते चांगले आहे, आपल्याला कोरोनाविरोधात लढाईचा दोन वर्षांचा अनुभव आहे. आर्थिक परिस्थितीचे नुकसान होईल असे होऊ द्यायचे नाही. सामन्य लोकांचे आर्थिक नुकसान होऊ नये आणि आर्थिक गती कमी होऊ नये याची खबरदारी घेत आहोत, असेही मोदी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here