जालन्यातील अंतरवाली सराटी गावात घडलेल्या घटने संदर्भात महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर यंत्रणा पूर्णता फेल गेल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन लाठीचार्जच्या किमान तीन दिवस आधीपासून सुरू होते. त्यामुळे ते संपूर्ण मराठवाड्यात त्याचे लोन पसरू शकते याची पुसटशी कल्पना देखील गुप्तचर यंत्रणेला लागू नये ही फार मोठी गोष्ट आहे. जालन्यात अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज नंतर मराठा आरक्षणाची आंदोलन राज्यभर पसरले. याचा फायदा उठवत विरोधी पक्ष देखील जालन्यात पोहोचून मराठा समाजाबद्दल आपल्याला असलेली सहानुभूती दाखवू लागला आहे. त्यामुळेच आता राज्यभर आंदोलनाचे पेव फुटले आहे.
जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार आणि गोळीबार करण्यात आलाय या घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला आणि पेटून उठला. या सगळ्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अशातच राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना सोमवार, ४ सप्टेंबर रोजी जालन्यात येणार आहेत. संजय सक्सेना हे जालन्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. जालन्यात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक स्वतः चौकशी करणार आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक जालन्यात घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
(हेही वाचा – Mangal Prabhat Lodha : उदयनिधी स्टॅलिन यांना महाराष्ट्रात बंदी घाला; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची मागणी)
मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा जसा विरोधक घेणार आहेत याबद्दल महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाला याची पुसटशीही कल्पना का आली नाही? राज्यात समाजात काय घडत आहे किंवा काय चर्चा सुरू आहे याची इतंभूत माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांमध्ये राज्य गुप्तचर विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. यामध्ये साध्या कपड्यातील पोलीस समाजामध्ये ठिकठिकाणी फिरून माहिती घेत असतात. परंतु, मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाची व्याप्ती किती वाढू शकते याबद्दल राज्य गुप्तचर विभाग कुठेतरी फेल झाल्याचे दिसून येत आहे. याचे सर्वात मोठे नुकसान राज्य सरकारला नक्कीच होणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community