उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘या’ नेत्यांनी केला भाजपात प्रवेश

त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेससह मनसेला धक्का बसला आहे.

180
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत 'या' नेत्यांनी केला भाजपात प्रदेश

विदर्भातील आघाडीचे ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे तसेच मनसेचे रमेश राजूरकर या बड्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (२५ जून) भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेससह मनसेला धक्का बसला आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे हे विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज आहेत. ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्याचे कार्य भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येत असून त्यामुळेच भारतीय जनता पक्ष हा ओबीसींना तारणहार ठरणारा पक्ष असल्याने आपण या पक्षात प्रवेश घेत असल्याची घोषणा डॉ. अशोक जिवतोडे यांनी केली होती. रविवारी त्याला मूर्त रूप देण्यात आले. अशोक जिवतोडे हे मागील ३५ वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

(हेही वाचा – Amul Girl : कोण होते सिल्वेस्टर दा कुन्हा? काय आहे अमूल गर्लची कहाणी?)

तर दुसरीकडे मनसेचे रमेश राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. वरोरा विधानसभा क्षेत्रात मनसेच्या तिकिटावर २०१९ ची निवडणूक राजूरकर लढले होते. त्या निवडणुकीत रमेश राजूरकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी रमेश राजूरकर यांच्या वरोरा येथील निवासस्थानी भेट दिली होती. रमेश राजूरकर हे मनसेचे मोठे शिलेदार समजले जात होते.

भद्रावती येथील जैन मंदिर सभागृहामध्ये पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. रमेश राजूरकर यांच्यासोबत वरोरा विधानसभा क्षेत्रातील अनेक सरपंच, सहकार सोसायटीचे अध्यक्ष, विविध पक्षांचे ५ हजार कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. चंद्रपुरातील जनता महाविद्यालयातील प्रांगणात डॉ. अशोक जिवतोडे यांनी १५ हजार कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. या पक्ष प्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी मंत्री शोभाताई, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, आमदार बंटी भांगडिया, माजी राज्यमंत्री परिणय फुके, आमदार संजीव बोदकुरवार, आमदार संदीप धुर्वे, आशिष देशमुख यांच्यासह भाजपचे आजी – माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.