Uttar Pradesh Election Result 2022: एकाही मुसलमानाला उमेदवारी न देता भाजपाने फडकावला भगवा

167

यंदाची उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक चांगलीच चर्चेत आली. कारण भाजपच्या विरोधातील मागील ५ वर्षांतील कार्यकाळात भाजपने शेतक-यांची मने दुखावली म्हणून टीका होत होती. राम मंदिराच्या निर्माणानंतर काशी पाठोपाठ मथुरेचे मंदिर पुर्नबांधणीचे कार्य हाती घेतले, त्यामुळे भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा आहे म्हणत याविरोधात समाजवादी पक्षाने मात्र मुस्लिमांच्या मतांना आकर्षित करण्यासाठी रणनीती रचली होती. तरीही भाजपने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. तरीही भाजपला उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. एकाही मुसलमानाला उमेदवारी न देता भाजपने उत्तर प्रदेशात भगवा फडकवून दाखवला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी लांगूलचालनाकडे केले दुर्लक्ष 

विशेष म्हणजे भाजपने २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत एकाही मुसलमानाला उमेदवारी दिली नव्हती, तरीही त्यावेळी भाजपने उत्तर प्रदेशात ३०० हुन अधिक ३२२ जागा जिंकल्या होत्या. मागील पाच वर्षांत राजकीय आणि सामाजिक पातळीवर बऱ्याच घडामोडी घडल्या. दिल्लीच्या सीमेवर २ वर्षे शेतकरी आंदोलन झाल्यामुळे त्याचा उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत भाजपवर परिणाम होईल, लखीमपुरी येथील या घटनेचाही भाजपवर परिणाम होईल अशी शक्यता होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या कार्यकाळात मुस्लिमांच्या सणावरामध्ये जुलूस काढण्यावर बंदी आणली होती, मशिदींवरील भोंगे हटवण्याचे आदेश दिले होते, जबरदस्तीने धर्मांतर करण्यावर प्रतिबंध करण्यात आले होते, त्याच बरोबर लव्ह जिहाद विरोधाची कायदा केला होता. यामुळे उत्तर प्रदेशात मुस्लिम मतदार नाराज होते, तरीही त्याचीही पर्वा न करता यंदाच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकाही मुसलमानाला उमेदवारी दिली नाही, तरीही या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपने अपना दल आणि निषाद पार्टी यांच्याशी युती केली. त्यामध्ये भाजपने २५० जागा लढवल्या होत्या, त्यामध्ये एकाही मुसलमानाला  भाजपने उमेदवारी दिली नाही, तरीही भाजपने उत्तर प्रदेशात भगवा झेंडा फडकावला.

(हेही वाचा Election Result 2022: पंजाबमध्ये ‘आप’च बाप! काँग्रेसला ‘झाडू’न काढले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.