वंदना बर्वे
महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू आहे. नव्या फेरबदलांत राज्यातून देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. शिवाय महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. २० जुलैपासून सुरू होणार्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी होते. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू आहे. नव्या फेरबदलांत राज्यातून देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे काही आमदार एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्या कोट्यातून मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. याशिवाय शिवसेनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
तसेच बिहारमधून रामविलास पासवान यांचे पूत्र चिराग पासवान यांना मंत्रिमंडळात आणण्याची चर्चा आहे. बिहारमधूनच नितीश यांना विरोध करत जेडीयू सोडलेल्या आरसीपी सिंह आणि उपेंद्र कुशवाह यांचा मंत्रिमंडळात समावेश असल्याची चर्चा आहे. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून मोदी मंत्रिमंडळात कोणताही मोठा बदल झालेला नाही. मात्र, मे २०२३ मध्ये केंद्र सरकारने कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना पदावरून हटवले. अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, कालच्या बंडात अजित पवार यांच्यासोबत असणाऱ्यांपैकी शरद पवारांचे निष्ठावान प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले जाणार आहे. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची बंद दाराआड बैठक झाली होती. या बैठकीत फेरबदलांविषयी चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Nitesh Rane : राष्ट्रवादीच सरकारमध्ये सहभागी झाल्याने ‘मविआ’ नामशेष; भाजपा आमदार नितेश राणेंचा घणाघात)
पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी?
- मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या महाराष्ट्रातून आठ मंत्री आहेत. यामध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, रामदास आठवले यांची नावे प्रमुख आहेत. महाराष्ट्रातून शिंदे गटाने तीन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास भाजपला आपल्या कोट्यातून काही मंत्र्यांना वगळावे लागणार आहे.
- कर्नाटकातून मोदी मंत्रिमंडळात सहा मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी ही दोन मोठी नावे आहेत. केंद्रीय मंत्री शोभा करंदळे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
- तेलंगणातून एक आणि तमिळनाडूतून दोन मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमधील मित्रपक्ष AIADMK ला मंत्रीपद दिले जाऊ शकते. तेलंगणातून मंत्री होण्याच्या शर्यतीत सोयाम बापूराव आणि धर्मापुरी अरविंद यांची नावे आघाडीवर आहेत.
- पीयूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community