एकीकडे लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जाहीर झाल्या तर दुसरीकडे काँग्रेस अजूनही प्रत्येक मतदारसंघाची माहिती करुन घेण्यासाठी प्रयत्न करतो आहे. मात्र त्याच मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने उमेदवार देखील जाहीर केले आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये अशा प्रकारचे चित्र दिसून येत आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस अजूनही सर्वेक्षणामध्येच अडकली असल्याची माहिती मिळाली आहे. प्रदेश काँग्रेस परिसरनिहाय तयारी तीव्र केली असली तरी अजूनही कोणत्या मतदारसंघात काय धोरण राबवावे लागेल, याविषयी केवळ चर्चाच सुरु असल्याचे समजते. (Lok Sabha Election)
(हेही वाचा – Deputy BMC Commissioner (Infrastructure) हे पद अखेर कंत्राटीच! शासनाने दिली मान्यता)
इंडी आघाडीत काँग्रेसला ८० पैकी अवघ्या १७ जागा
सध्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारींना त्या-त्या भागातील कामाचा अहवाल द्यावा लागणार आहे. यामध्ये बूथनिहाय केलेली रणनीती सांगावी लागेल. हा अहवाल राज्यातील मुख्यालयातून राष्ट्रीय कार्यालयाकडे पाठवला जाईल. इंडी आघाडीत काँग्रेसला ८० पैकी अवघ्या १७ जागा वाट्याला आल्या आहेत. या सर्व जागावर काँग्रेसने ताकद पणाला लावली आहे, असे समजते. (Lok Sabha Election)
पक्षाच्या नव्या नेत्यांसोबतच जुने नेतेही सक्रिय झाले आहेत. बूथनिहाय बैठक सुरु आहेत. पक्षांने लोकसभा मतदारसंघनिहाय प्रभारींना प्रत्येक आठवड्याला आपापल्या मतदारसंघाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये बूथचे जातींचे गणित, आघाडीचे उमेदवार व इतर उमेदवारांमुळे तयार होत असलेली समीकरणे, पक्षांने दिलेल्या सुचनांचे पालन करून बूथ कमिट्यांच्या बैठकांना उपस्थित राहणाऱ्या ज्येष्ठ नेत्याची उपस्थिती यासह अन्य माहिती द्यावी लागणार आहे. हा अहवाल प्रदेशाध्यक्ष, प्रदेश प्रभारी तसेच केंद्रीय पथकाला पाठविण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्या म्हणण्यानुसार, पक्षांचे नेते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सक्रिय आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन पुढील रणनीती तयार करण्यासाठी कामे सुरु आहेत. (Lok Sabha Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community