आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावर चर्चा होत असतानाच, काँग्रेसने मात्र राज्यातील सर्व ४८ जागांसाठीच्या इच्छुकांची यादी मागवली आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे, की आघाडीतील मित्रपक्षांवर दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Lok Sabha Election 2024)
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे मुख्यमंत्री व विधिमंडळ नेत्यांची गुरुवारी दिल्लीत बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या बैठकीसाठी गेले होते. दिल्लीतील बैठकीनंतर सर्व जिल्हाध्यक्षांकडून महाराष्ट्रातील इच्छुकांची नावे १० जानेवारीपर्यंत पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्षांकडून नावे मागवली आहेत. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने ठाणे ते दादर बाईक रॅलीसह विशेष कार्यक्रमांचे आयोजन)
एखादा पक्ष चाचपणी करत असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही – संजय राऊत
यासंदर्भात ठाकरे गटाचे (UBT Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, एखादा पक्ष चाचपणी करत असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सुद्धा गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील ४८ जागांची चाचणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसने यादी मागवली असेल, तर त्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community