स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेट्रो २अ’ या मार्गावरील सुशोभिकरण केलेल्या डब्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डहाणूकरवाडी ते दहिसर (पूर्वी) दरम्यानच्या अतिरिक्त मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना केले. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास उपस्थित होते.
( हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन दिला नवा नारा; ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’ )
गुणवत्तापूर्ण सेवा पुरविण्याच्या सूचना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डहाणूकरवाडी येथील मेट्रो अधिकारी, चालक तसेच प्रवाशांबरोबर संवाद साधला. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच इंधन आणि प्रवाशांच्या वेळेत बचतीसाठी मेट्रो हा एक उत्तम पर्याय आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मेट्रोच्या विविध कामे प्रगतीपथावर असून मेट्रोचा एक- एक टप्पा पुढे जातो आहे. त्यामुळे मेट्रोद्वारे प्रवाशांचा आरामदायी, सुखकर प्रवास व्हावा, यासाठी मेट्रोने अधिक दर्जेदार गुणवत्तापूर्ण सेवा पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.
Join Our WhatsApp Community