दादा–फडणवीस एकाच मंचावर, नेमकं काय शिजतंय?

160

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस.. राज्याच्या राजकारणातील ही दोन मोठी नावे. मात्र हे दोघे एकत्र येणार म्हटल्यावर राज्यातील राजकारणात चर्चा रंगू लागते. हे दोघे एकत्र येणार म्हणजे कुछ तो गडबड है दया असाच सुर राज्यातील राजकारणात आणि जनतेमध्ये असतो. भल्या पहाटेची शपथ यानंतर तर ठाकरे सरकारला देखील यांच्या भेटीच्या बातम्यांनी धडकी भरते.  आज देखील हे दोन्ही नेते एका व्यासपिठावर येणार असे माध्यमांना समजताच माध्यमांसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. मात्र या सर्व चर्चांना अजित दादांनी मात्र त्यांच्या स्टाईलनेचे उत्तर दिले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यामध्ये कोविड रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी हे दोघेही एकाच मंचावर उपस्थित होते.

काय म्हणाले अजित पवार

आम्ही दोघे एकाच मंचावर येणार म्हटल्यावर माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्या. परंतू त्यांना चंद्रकांत पाटील देखील येथे येणार हे माहिती नव्हते. अन्यथा त्याच्याही चर्चा रंगल्या असत्या. राजकारणात आम्ही एकमेकांचे विरोधक आहोत. निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात असतो. परंतू निवडणुका झाल्यानंतर हा सत्ताधारी पक्षाचा, हा विरोधी पक्षाचा असा भेदभाव न करता (कोरोना) अशा संकटाच्या वेळी एकमेकांच्या चुका दाखवण्यापेक्षा कोणती उणीव जर राहत असेल तर ती दाखवून देणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे’, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

फडणवीस म्हणाले माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही

बाणेर आणि पिंपरी चिंचवड या दोन ठिकाणी कोविड रुग्णालयाचे उद्घाटन या दोन्ही नेत्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी देवेंद्र  फडणवीस यांनी माझा आवाज कुणीही दाबू शकत नसल्याचे सांगितले.  कार्यक्रमा दरम्यान देवेंद्र फडणवीस  भाषण करत असताना माईक मधून आवाज येत नव्हता,  त्यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आवाज आवाज असे म्हणून लागले, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मास्क खाली घेत ”माझा आवाज कुणी दाबू शकत नाही.” असे विनोदाने म्हणाले हे ऐकताच फडणवीस यांच्या बाजूला असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हसू आवरले नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.