वनतारा वाईल्डलाईफचे PM Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन; सिंहाच्या छाव्यांना दूध पाजलं, वाघासोबत काढले फोटो

139
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वनतारा (vantara jamnagar) येथील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन वाईल्डलाईफ केंद्राचे (Wildlife Center) जागतिक वन्यजीव दिनानिमित्त मंगळवारी ०४ मार्च रोजी उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी सिंह आणि बिबट्याच्या पिल्लांना दूध पाजले आणि विविध घटनांमधून वाचवलेल्या अनेक प्राण्यांनाही भेट दिली. सध्या वनतारामध्ये दोन हजाराहून अधिक प्रजाती आणि दीड लाखांहून अधिक संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेतली जात आहे. (PM Narendra Modi)

मिळलेल्या माहीतीनुसार, जामनगर (Jamnagar, Gujarat) स्थित वनतारा वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राची आणि प्राण्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. तसेच विविध ठिकाणाहून सुटका करण्यात आलेल्या प्राण्यांच्या विविध प्रजातींना भेट देऊन त्यांना खायला दिले. पंतप्रधानांनी वनतारा येथील वन्यजीव रुग्णालयाला भेट दिली. यात प्राण्यांसाठी एमआरआय, सीटी स्कॅन, आयसीयू आणि इतर सुविधा आहेत. त्यात वन्यजीव भूल, हृदयरोग, नेफ्रोलॉजी, एंडोस्कोपी, दंतचिकित्सा, अंतर्गत औषध यासह अनेक विभाग आहेत.

(हेही वाचा – ‘आझमी, छावा बघा छावा’; Eknath Shinde अबू आझमींविरोधात आक्रमक)

पंतप्रधानांनी सिंहाच्या पिल्लांना दूध पाजले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी विविध प्रजातींच्या सिंहाच्या पिल्लांशी खेळले आणि त्यांना जवळ घेतलं. त्यामध्ये आशियाई शावक, पांढरे सिंह शावक, कॅराकल शावक आणि ढगाळ बिबट्या शावकांचा समावेश आहे. ढगाळ बिबट्या ही लुप्तप्राय प्रजाती आहे. ज्या पांढऱ्या सिंहाच्या पिल्लाला पंतप्रधानांनी दूध पाजले होते, त्याच्या आईची सुटका करून तिला वनतारा येथे आणले तेव्हा केंद्रात जन्माला आले. एकेकाळी भारतात कॅरॅकल्स असंख्य होते, पण आता दुर्मिळ होत आहेत. वनतारा येथे, प्रजनन कार्यक्रमांतर्गत कॅराकलची पैदास केली जाते आणि त्यांच्या संवर्धनासाठी बंदिवासात ठेवले जाते आणि नंतर जंगलात सोडले जाते.
MRI रूम आणि ऑपरेशन थिएटरला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुग्णालयातील एमआरआय कक्षाला भेट दिली आणि एशियाटिक सिंहांचे (Asiatic lion) एमआरआय करताना त्यांनी पाहणी केली. याशिवाय त्यांनी ऑपरेशन थिएटरलाही भेट दिली, जिथे बिबट्यावर शस्त्रक्रिया केली जात होती. त्या बिबट्याला महामार्गावर एका कारने धडक दिली होती. त्यानंतर त्याला वाचवून वनतारा येथे आणण्यात आले. इतर ठिकाणांहून सुटका करण्यात आलेल्या प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाप्रमाणे असलेल्या ठिकाणी ठेवले जाते. वनतारामधील काही प्रमुख संवर्धन उपक्रमांबद्दल सांगताना, त्यात एशियाटिक सिंह, हिम बिबट्या (snow leopard), एक शिंगे असलेला गेंडा इत्यादींचा समावेश आहे.

(हेही वाचा – छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात Shiv Sena चे राज्यभर आंदोलन)

अनेक प्राण्यांना जवळ घेतलं
पंतप्रधान मोदींनी विविध प्राण्यांशी जवळून संवाद साधला. त्यांनी गोल्डन टायगर आणि स्नो टायगर्सच्या समोर बसून फोटोही काढले. ते चिंपांजीसोबत खेळले आणि ओरांगउटानला प्रेमाने मिठी मारली. यानंतर पंतप्रधानांनी एका पाणघोड्याला जवळून पाहिले. मगरी पाहिल्या, झेब्रा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी फेरफटका मारला. जिराफ आणि गेंड्याच्या पिल्लांना खायला दिले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.