मोदी सरकारच्या (Modi Government) कार्यकाळात देशात घडणार्या दंगलींचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये दंगलींचे प्रमाण ९० टक्के कमी झाले आहे, तर काँग्रेसशासित राज्यांमध्ये ३० टक्के अधिक प्रमाणामध्ये दंगलींची नोंद झाली आहे. गेल्या ५ वर्षांत दंगलींचे प्रमाण कमी होत चालले आहे. वर्ष २०२२ मध्ये देशभरात सर्वांत अल्प प्रमाणात दंगली झाल्या आहेत. ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’ने (एन्.सी.आर्.बी.ने) ही माहिती दिली आहे.
गेल्या ५ वर्षांत दंगलींचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्याच वेळी, वर्ष २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये दंगलीच्या संख्येत ९.५ टक्क्यांनी घट झाली आहे. २०२१ मध्ये देशात दंगलींची संख्या ४१ हजार ९५४ होती, तर २०२२ मध्ये देशात दंगलीच्या केवळ ३७ हजार १५७ घटना घडल्या आहेत. भाजपशासित राज्यांनी दंगली कमी करण्यात आणि कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यात चांगली कामगिरी केली आहे, तर काँग्रेसशासित राज्ये यामध्ये मागे असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या ५ वर्षांत उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि आसाम या राज्यांनी दंगली कमी करण्यात चांगले यश मिळवले आहे.
काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये दंगलींत वाढ
वर्ष २०२१८ मध्ये छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारच्या काळात दंगली वाढल्या. वर्ष २०१८ मध्ये दंगलीच्या ६६५ घटना घडल्या, तर वर्ष २०२२ मध्ये या घटना ३० टक्क्यांनी वाढून ९६१ झाल्या.
Join Our WhatsApp Community