‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी

118

शिवसेना पदाधिकारी आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारल्याची घटना नुकतीच घडली असताना आता शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. यासह वादग्रस्त आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल तसेच सदानंद कदम यांच्या निवासस्थानी आयकर खात्याचे छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे.

(हेही वाचा – एसटीच्या विलीनीकरणावर ठाम! पुन्हा एकदा संपकऱ्यांचा आझाद मैदानात एल्गार!)

राहुल कनाल हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी सुरु आहे. मंगळवारी आयकर विभागाने मुंबईत आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे. ही छापेमारी कोणत्या प्रकरणाशी संबिधीत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आयकर विभागाने धाड मारल्याने खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आयकर विभागाने शिर्डी देवस्थानचे ट्स्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी धडकले आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागाने धाड मारल्याने एकच खळबळ उडाली आहे.

राहुल कनाल यांच्याबद्दल… 

  • राहुल कनाल शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी आहेत
  • मातोश्रीच्या जवळचे म्हणून राहुल कनाल यांची ओळख
  • युवा सेना कोअर कमिटीत राहुल कनाल आहेत
  • टीम आदित्यचा एक चेहरा राहुल कनाल आहे
  • राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत राहुल कनाल यांच्या नावाची होती चर्चा
  • महापालिकेत शिक्षण समिती सदस्य देखील राहिले आहेत
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.