नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस अर्थात एक एप्रिलपासून देशात महत्त्वाचे बदल होणार आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG cylinder) किमतीपासून ते बँक खाते, क्रेडिट कार्ड आदींच्या नियमावलीत बदल होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेल्या नवीन कर दरांची अंमलबजावणी एक एप्रिलपासूनच होणार आहे. (Income Tax )
( हेही वाचा : New Vehicle Registration : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६,८१४ वाहनांची नोंदणी)
त्यात १२ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना करमुक्ती मिळेल. वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी स्टँडर्ड डिडक्शन ७५,००० रुपये करण्यात आले आहे. याचा अर्थ १२.७५ लाख रुपयांपर्यंत वेतन असलेल्यांना कर भरावा लागणार नाही. हे नियम केवळ नवीन कर प्रणाली स्वीकारणाऱ्यांसाठी लागू असतील. (Income Tax)
तसेच प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला तेल आणि वायू वितरण कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींत बदल होतात. गेल्या काही महिन्यांमध्ये व्यावसायिक (१९ किलो) एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinder) किमतींमध्ये चढ-उतार दिसून आले आहेत; तर घरगुती (१४ किलो) गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ग्राहकांना गॅसच्या दरांमध्ये काही प्रमाणात सवलतीची अपेक्षा आहे. (Income Tax )
एप्रिल २०२५ पासून क्रेडिट कार्डद्वारे (credit card) रिवॉर्ड पॉईंटस् आणि अन्य सुविधांमध्ये बदल होईल. भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकसह इतर अनेक बँका त्यांच्या बचत खात्यांमध्ये न्यूनतम शिल्लक नियम बदलत आहेत. नवीन नियमांनुसार, खातेधारकांना सेक्टरनुसार मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल. खात्यात पुरेसा शिल्लक नसेल, तर दंड आकारला जाऊ शकतो. (LPG cylinder)
दरम्यान जर एखाद्या मोबाईल नंबरशी लिंक असलेले यूपीआय (UPI) खाते दीर्घकाळ सक्रिय नसेल तर बँक ते बंद करू शकते. जर तुम्ही तुमच्या यूपीआय अकाऊंटचा बराच काळ वापर केला नसेल, तर एक एप्रिलपासून तुमच्या बँकेच्या रेकॉर्डमधून तो नंबर हटवला जाऊ शकतो. (LPG cylinder)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community