बीबीसी वृत्तसंस्थेच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांची मंगळवारी आयकर विभागाकडून (Income Tax) पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर आता आयकर विभागाकडून पुण्यात सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे (Aniruddha Deshpande) यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केल्याची माहित मिळत आहे.
पुण्यातील उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर बुधवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. पहाटेपासूनच देशपांडे यांचे घर आणि कार्यालयाची झाडाझडती सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनिरुद्ध देशपांडे यांचे शरद पवारांसह राज्यातल्या अनेक बड्या राजकाराण्यांशी निकटचे संबंध आहेत. त्यामुळे आयकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहे.
दरम्यान मंगळवारी बीबीसीने ट्रान्सफर प्राइसिंग नियमांचे जाणीवपूर्वक पालन न केल्यामुळे आयकर विभागाने बीबीसी कार्यालयाची पाहणी केली होती. यावेळी बीबीसीच्या अकाऊंटस विभागातील कर्मचाऱ्यांना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोन वापरण्यास मनाई केली. यादरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वित्त व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप, कंप्युटर्सची पाहणी केली. तसेच कागदपत्रांची तपासणी केली.
(हेही वाचा – कोईम्बटूर स्फोट प्रकरणी एनआयएची तीन राज्यात ६० ठिकाणी छापेमारी)
Join Our WhatsApp Community