राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचारार्थ आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” या नावाने कल्याण निधीची स्थापना करण्यास तसेच, या निधीच्या व्यवस्थापनासाठी महासंचालक, माहिती व जनसंपर्क यांच्या अध्यक्षतेखाली एक विश्वस्त संस्था (ट्रस्ट) स्थापन करण्यात आली आहे. ३१ मार्च २०२३ रोजीच्या शासननिर्णयान्वये या कल्याण निधीच्या रकमेत १५ कोटी रुपयाने वाढ करून ती ३५ कोटीवरुन ५० कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. या निधीमधून ज्येष्ठ पत्रकारांना (Senior Journalists) सामाजिक सुरक्षा, सुविधा देण्याच्या दृष्टीने “आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना” अंतर्गत दरमहा ११ हजार रुपये सन्मान निधी दिला जातो. त्यामध्ये वाढ करून ती रक्कम २० हजार रुपये करण्यात आली आहे.
(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : एकूण सात टप्प्यांमध्ये होणार निवडणूका; शनिवारी होणार तारखा जाहीर)
मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ पत्रकारांना (Senior Journalists) देण्यात येणाऱ्या सन्मान निधीत ११,००० ऐवजी रुपये २०,००० इतकी वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र त्याविषयीचा शासन निर्णय निर्गमित झाला नसल्याची बाब विधान परिषद सदस्यांनी सभागृहामध्ये उपस्थित केली असता त्यावर हा शासन निर्णय येत्या दोन दिवसात काढण्यात येईल असे आश्वासन सरकारने सभागृहात दिले होते. त्यानुसार १४ मार्च रोजी हा शासन निर्णय काढण्यात आला. त्यानुसार ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच, त्यांना सामाजिक सुरक्षा वा देण्याचा विचार करुन तसेच, वृध्दावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांच्या गौरव करण्याकरीता “आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना” या अधिस्वीकृतीधारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना (Senior Journalists) १० मार्च २०२२ शासननिर्णयांन्वये देण्यात येणारे अर्थसहाय्य दरमहा ११,००० रुपयांवरून दरमहा २०,००० रुपये करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community