शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवणार, बैठकीत झाला निर्णय

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या उठावानंतर या आमदारांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून या आमदारांचा उल्लेख गद्दार असा करण्यात येत आहे. यातच मंगळवारी आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळेच या आमदारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

सुरक्षा वाढवण्याचे निर्देश

उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात येत असून बुधवारी झालेल्या सरकारच्या बैठकीतही यावर चर्चा करण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्याचे पोलिस महासंचालक यांना याबाबतचे निर्देश देण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

(हेही वाचाः सामंतांच्या गाडीवर हल्ला करणारे शिवसैनिक नाहीत तर राष्ट्रवादीचे लोक, पडळकरांचा आरोप)

मुख्यमंत्र्यांनी केला निषेध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. गाडीवर दगड मारुन पळून जाणे ही मर्दुमकी नाही. ज्यांनी हा भ्याड हल्ला केला आहे त्यांच्यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

5 जणांना अटक

दरम्यान, उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे,सुरज लोखंडे,संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जाणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.दं.वि.च्या 353,120,307,332 कलमांनुसार या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचाः उदय सामंत हल्ला प्रकरण: आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here