उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या (South Korea) येओनप्योंग बेटावर गोळीबार केला, त्यामुळे दक्षिण कोरियाच्या प्रशासनाने तेथील स्थानिकांना ते बेट रिकामे करण्यास सांगितले. याशिवाय जवळच्या बेंगनिओंग बेटालाही रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण कोरियाने हुकूमशहा किंग जोंग उन यांच्या या कारवाईला प्रक्षोभक कृत्य म्हटले आहे. उत्तर कोरियाने 2010 मध्येही अशाच प्रकारची कारवाई केली होती. त्यामुळे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये कधीही युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दोन्ही देशांमधील लष्करी करार संपला
या हल्ल्यात दक्षिण कोरियाच्या (South Korea) येओनप्योंग बेटावरील 4 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी 13 वर्षांनंतर उत्तर कोरियाने डागलेले तोफांचे गोळे बफर झोनमध्ये पडले. म्हणजेच ते अशा भागात पडले जिथे उत्तर कोरिया किंवा दक्षिण कोरियाचे नियंत्रण नाही. सध्या उत्तर कोरिया युद्धाच्या तयारीत आहे, उत्तर कोरियाने त्यासाठी शस्त्रास्त्र साठा करणे सुरु केले असून सैनिकी ताकद वाढवत आहे. अलीकडेच उत्तर कोरियाने दक्षिण कोरियामधील (South Korea) लष्करी करारही संपुष्टात आणला. दोन्ही देशांमधील संबंध सुधारणे हा या कराराचा उद्देश होता. 1 जानेवारी रोजी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने त्यांच्या सैन्याला कधीही युद्धाला तयार रहा, असे सांगितले.
Join Our WhatsApp Community