महाविकास आघाडी सरकार राज्यातील महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी विधेयक विधानसभेत मांडले आहे. खरे तर यामागे सरकारचा स्वार्थ दडलेला आहे. नगरसेवकांची संख्या वाढवून या सरकारमधील तिन्ही पक्षांना त्यांच्या उमेदवारांची ‘सोय’ करायची आहे, असा शब्दांत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भांडाफोड केला. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत सुधारणा विधेयक हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी केली.
हा कसला हट्ट?
महाआघाडीतील वाढीव इच्छुकांना संधी मिळावी यासाठी हा खटाटोप आहे. लोकसंख्येच्या जोरावर या सरकारला नगरसेवकांची संख्या वाढवण्याची घाई लागली आहे. पण लोकसंख्येच्या आधारे रुग्णालयांतील खाटा का वाढवत नाही, त्या कमी होत आहेत, याकडे का लक्ष देत नाही. आर्थिक पाहणी अहवाल पाहिल्यास जून १९७१ साली १ लाख लोकसंख्येमागे ८८ खाटा होत्या, १९८१ मध्ये ११४ खाटा होत्या, १९९१ मध्ये १४४ तर ३१ मार्च २०२० मध्ये १०२ खाटा होत्या. त्या का वाढल्या नाहीत? महसुली विभागही लोकसंख्येच्या तुलनेत वाढत नाहीत, असे का? तुम्हाला मुंबईत २२७ नगरसेवक वाढवून ती संख्या २३६ करायची आहे. हा कसला हट्ट आहे, बालहट्ट आहे, स्त्री हट्ट आहे, कोणता हट्ट आहे?, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी विचारला.
(हेही वाचा अजित पवारांनी आमदारांना दिले शिस्तीचे धडे! म्हणाले, मुख्यमंत्र्यांची तरी खूर्ची सोडा!)
Join Our WhatsApp Community