भारत देश येत्या गुरुवारी १५ ऑगस्टला ७८ वा स्वातंत्र्यदिन (#independenceday) साजरा करीत असताना काही जुन्या गोष्टींचा उलघडा नव्याने झाला आहे. देशाने पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला त्यावेळी मुंबईला एका वेगळ्या राज्याचा दर्जा होता आणि राज्याचे मुख्य सचिव हे एक ब्रिटिश अधिकारी होते आणि त्यांनीच स्वातंत्र्यदिन कसा साजरा करावा याबाबचे आदेश काढले होते, हे अनेकांना माहित नाही.
(हेही वाचा – Mumbai Metro 9 : विरार लोकलची गर्दी कमी होणार? कशी आहे मेट्रो 9 ची मार्गिका? वाचा सविस्तर…)
२९ जुलै १९४७ चा आदेश
१५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. मुंबईतसह देशभरात प्रचंड उत्साह होता. लाखो भारतीयांनी जिवाची पर्वा न करता स्वातंत्र्यलढा लढला आणि तो दिवस साजरा करण्याची वेळ जवळ आली होती. अत्यंत भारावलेले वातावरण होते. मात्र हा स्वातंत्र्यदिन (#independenceday) कसा साजरा करावा, याचे आदेश मुख्य सचिव असलेल्या ब्रिटिश अधिकारी आय. एच. टौनटन यांनी २९ जुलै १९४७ ला काढले.
सहा आण्यापेक्षा अधिक खर्च नको
‘शासनाने असा निर्णय घेतला आहे की सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी प्राथमिक शाळेतील मुलांना मिठाई वाटप करण्याची व्यवस्था करावी. तसेच त्यासाठी प्रत्येक मुलामागे ६ आण्यापेक्षा अधिक खर्च करू नये,’ असे या आदेशात म्हटले होते. मिठाई वाटपांच्या कामात प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा शिक्षण पर्यवेक्षकांनी मदत करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या होत्या. काही वृक्षारोपण कार्यक्रमदेखील शाळांमध्ये आयोजित करण्यात यावेत. शासनाकडून शाळेतील मुलांसाठी लहान बिल्ले उपलब्ध केले जातील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले होते.
(हेही वाचा – Pooja Khedkar यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!)
उमेश काशीकर यांचे संशोधन
महाराष्ट्राच्या राज्यपालांचे शासकीय निवासस्थान असलेल्या राजभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, ज्यांनी गेली अनेक वर्षे विविध राज्यपाल जवळून पाहिले आहेत त्यांनी आपले शासकीय कामकाज सांभाळत काही विषयांवर संशोधन केले. त्यात त्यांना काही जुन्या कार्यालयीन आदेश, शासकीय अधिसूचनांचा दस्तऐवज सापडला आणि हा ठेवा काशीकर यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ‘हिंदुस्थान पोस्ट’शी त्यांनी खास बातचीत केली आणि देश पहिला स्वातंत्र्यदिन (#independenceday) साजरा करण्यापूर्वी आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिनापर्यंत मुंबई राज्याच्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community