I.N.D.I. Alliance चे अस्तित्व संपुष्टात ?

315
I.N.D.I. Alliance चे अस्तित्व संपुष्टात ?
  • प्रतिनिधी 

लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इंडी आघाडी (I.N.D.I. Alliance) जेवढ्या वेगाने निर्माण करण्यात आली होती. त्याच वेगाने इंडी आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येते की काय? अशी चर्चा राजधानीत चांगलीच रंगली आहे. कारण हरियाणामध्ये निवडणूक एकत्र लढवून इंडी आघाडी सक्षम असल्याचा संदेश लोकांपर्यत राहुल गांधी यांनी पोहोचवायचा होता. मात्र केजरीवाल कारागृहातून बाहेर आल्यानंतर संपूर्ण चित्र बदलले.

(हेही वाचा – Pakistan मध्ये दोन हिंदू मुलींचे अपहरण; जबरदस्तीने धर्मांतर केल्याची भीती)

हरियाणाची निवडणूकच नव्हे तर आगामी दिल्ली निवडणूक देखील आप आणि काँग्रेस स्वतंत्ररित्या लढणार आहेत, यामुळे इंडी आघाडीचे (I.N.D.I. Alliance) अस्तित्व संपुष्टात आले की काय? अशी शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोन पक्षांत लोकसभा निवडणुकीच्या वेळी जवळीक निर्माण झाली होती ती आता संपुष्टात आल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांतच राजकारण झपाट्याने बदलले आहे.

(हेही वाचा – वेद हे भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञानाचे स्त्रोत आहेत- Mohan Bhagwat)

हरियाणात दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्याची चर्चा होती आणि राहुल गांधी यांचीही तशीच इच्छा होती. तथापि, आता हे दोघेही पक्ष परस्परांच्या विरोधात लढत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यावर काँग्रेस आणि आप यांचा समेट होईल असे वाटत होते. दिल्लीतील झपाट्याने बदलणाऱ्या राजकारणात काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये दखल घेण्यासारखी आहेत. काही महिन्यांनी दिल्लीत निवडणुका आहेत आणि दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी आता आपच्या विरोधात दिल्ली मध्ये देखील लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. (I.N.D.I. Alliance)

(हेही वाचा – Train Accident : उत्तरप्रदेशमध्ये अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, 14 गाड्या रद्द)

दिल्लीतही आपविरुद्ध काँग्रेस थेट लढणार

दिल्लीमध्ये देखील काँग्रेसने आपच्या विरोधात उपडपणे निवडणूक लढविण्याचे मन बनवलेले दिसते. दिल्ली काँग्रेसच्या प्रमुखांनीही हा इशारा दिला आहे. राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की, काँग्रेस पक्ष इंडी आघाडीतील आपला सहभाग करण्याबाबत संभ्रमात आहे. त्याच वेळी, एक अस्वस्थता देखील स्पष्टपणे दिसते आहे. सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला तेव्हा केंद्रीय काँग्रेसने त्याचे स्वागत केले, परंतु दिल्ली राज्य युनिटने वेगळी भूमिका घेतली. जामिनाच्या अटींमुळे केजरीवाल काम करू देणार नाहीत म्हणून दिल्लीच्या प्रशासनाबाबत आपल्याला काळजी वाटत असल्याचं दिल्ली काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी म्हटले होते. (I.N.D.I. Alliance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.