युद्ध संपले नाही! शस्त्र ठेवू नका!

देशाकडे गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठ्या जागतिक साथीला सामोरे जाण्यासाठी लसींच्या १०० कोटी डोसची मजबूत संरक्षक ढाल आहे. ही भारताची, भारतातील प्रत्येक नागरिकाची मोठी उपलब्धी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

166

देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. सुरक्षेचे कवच कितीही उत्तम असेल, कितीही आधुनिक असेल, सुरक्षेची कितीही हमी देणारे असेल तरीही कोरोनाचे युद्ध संपलेले नाही, जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोपर्यंत शस्त्र ठेवू नका. मास्क घालूनच घराबाहेर पडा. सण-उत्सवाच्या काळात अधिक सतर्क राहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

लसीकरणात भेदभाव केला नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. कोणताही भेदभाव न करता विक्रमी लसीकरण करुन दाखवले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात कोणतेही व्हीआयपी कल्चर घुसू दिले नाही. यामध्ये सगळ्या देशवासियांचे प्रयत्न होते, असे सांगतानाच मेड इन इंडियाची ताकद सर्वांत मोठी, हे देशाने पुन्हा एकदा दाखवून दिले. जसे घराबाहेर पडताना पायात बूट घालण्याची सवय आहे, तशी सवय मास्क घातल्याशिवया घराबाहेर पडू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

सामूहिक शक्तीमुळे 100 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला

देशाकडे गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठ्या जागतिक साथीला सामोरे जाण्यासाठी लसींच्या १०० कोटी डोसची मजबूत संरक्षक ढाल आहे. ही भारताची, भारतातील प्रत्येक नागरिकाची मोठी उपलब्धी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. १०० कोटी व्हॅक्सिन डोस हा केवळ आकडा नाही. तर देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. नव्या अध्यायाची सुरुवात आहे. नव्या भारताची सुरुवात आहे. अवघड लक्ष्य पूर्ण करणाऱ्या भारताचे लक्ष्य आहे. केवळ सामूहिक शक्तीमुळे १०० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला, असेही मोदी म्हणाले.

(हेही वाचा : ‘व्होकल फॉर लोकल’ व्यवहारात आणा!)

लसीकरण करताना विज्ञानाची कास सोडली नाही

भारताची इतर देशाशी तुलना केली जात आहे. त्याचे कौतुकही केले जात आहे. आपण याची सुरुवात कशी केली हे महत्वाचे आहे. व्हॅक्सिनची निर्मिती करण्यात इतर देशांचा हातखंडा होता. आपणही याच देशांवर अवलंबून होतो. त्यामुळे भारतही त्यांच्यावर अवलंबून होता. महामारी आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. भारत कोरोना व्हॅक्सिन तयार करेल का? भारत आपल्या देशातील लोकांची काळजी कशी घेणार? सर्वांना लस देईल का असे प्रश्न निर्माण झाले होते. पण भारताने सर्वांना लस दिली. मोफत दिली. कोणतीही रक्कम घेतली नाही, लसीकरण करताना विज्ञानाची कास सोडली नाही आज सोडणार नाही, असे मोदी म्हणाले.

व्हीआयपी कल्चरला वाढू दिले नाही

या लसीकरणामुळे जग भारताला अधिक सुरक्षित मानेल. संपूर्ण जग भारताची ताकद पाहत आहे. सबका साथ सबका विश्वासच सर्वात मोठे उदाहरण आहे, असे सांगतानाच आजार सर्वांनाच होतो. त्यामुळे त्यावर व्हीआयपी कल्चरचा प्रभाव होऊ नये. केवळ व्हीआयपी लोकांनाच लस मिळू नये याची काळजी घेण्यात आली. कितीही श्रीमंत असला तरी त्याला सामान्य नागरिकांप्रमाणेच ट्रीटमेंट मिळेल हे पाहिले. त्यामुळेच सर्वांना लस मिळू शकली, असे ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.