दोन दिवसापासून तुम्ही देशाची संस्कृती आणि सनातन धर्माचा अपमान करत आहात. भारतीय आघाडीतील दोन प्रमुख पक्ष काँग्रेस आणि द्रमुक सनातन धर्म संपुष्टात आणला पाहिजे, असे म्हणत आहेत. वोट बँकेचे राजकारण करण्यासाठी या लोकांनी सनातन धर्माचा अपमान केला आहे, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘डास, डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांच्याप्रमाणे सनातन धर्माचे निर्मूलन झाले पाहिजे’, अशी गरळओक केली आहे. त्याविषयी अमित शाह बोलत होते. भाजपसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या विधानावरून द्रमुकच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. राजस्थानमधील डुंगरपूर येथील सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी उदयनिधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
(हेही वाचा – NCP-Shivsena : राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद मागितले, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मौन बाळगले – प्रफुल पटेल यांचा दावा)
या वेळी अमित शहा पुढे म्हणाले, “ते म्हणतात की, मोदी जिंकले, तर सनातन राज येईल. सनातन लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की देश संविधानाने चालेल. राहुल गांधी म्हणाले होते की, हिंदू संघटना लष्कर-ए-तैयबापेक्षाही धोकादायक आहेत. राहुल बाबा, तुम्ही हिंदू संघटनेची तुलना लष्कर-ए-तोयबाशी करत आहात, तर तुमचे गृहमंत्री म्हणायचे की हिंदू दहशतवाद सुरू आहे. वोट बँकेचे राजकारण करण्यासाठी ‘इंडिया’ युती कोणत्याही थराला जाऊ शकते.
आम्ही हिंदू धर्मावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण होऊ देणार नाही – भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा
त्याचवेळी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आज जगात भारताचा गौरव होत असताना ही अहंकारी युती आपल्या देशाच्या संस्कृतीवर आणि धर्मावर मोठा आघात करत आहे . इंडिया आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या द्रमुकने ‘सनातन धर्म’ संपवण्याची घोषणा केली. आम्ही सनातन धर्म संपुष्टात येऊ देणार का ? आम्ही हिंदू धर्मावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण होऊ देणार का ? मला राहुल गांधींना विचारायचे आहे की, तुम्ही हिंदू धर्म आणि सनातन धर्माचा द्वेष विकून हे प्रेमाचे दुकान कसे चालवत आहात ?
हेही पहा –
Join Our WhatsApp Community