India Alliance PM Candidate : राहुल गांधी नाहीत.. ‘हा’ असू शकतो पंतप्रधानपदाचा चेहरा ?; सोनिया गांधी यांचे संकेत

India Alliance PM Candidate : लोकसभेच्या निवडणुकीत 'इंडी' आघाडीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असतील ? याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तसे संकेत दिले आहेत.

127
India Alliance PM Candidate : राहुल गांधी नाहीत.. 'हा' असू शकतो पंतप्रधानपदाचा चेहरा ?; सोनिया गांधी यांचे संकेत
India Alliance PM Candidate : राहुल गांधी नाहीत.. 'हा' असू शकतो पंतप्रधानपदाचा चेहरा ?; सोनिया गांधी यांचे संकेत

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल (Result of assembly election) आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागतील. विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’च्या (india alliance) आतापर्यंत 3 बैठका होऊन गेल्या आहेत. विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, हे स्पष्ट झालेले नाही. (India Alliance PM Candidate)

(हेही वाचा – Israel Hamas War : इस्रायलला मोठा धक्का; जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला)

सोनिया गांधी यांच्या भाषणामुळे उंचावल्या भुवया

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या विरोधात विरोधकांकडून कुणाचा चेहरा पुढे केला जाईल ? याबाबत लवकरच खुलासा होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस संसदीय मंडळाच्या (Congress Parliamentary Board) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी तसे संकेत दिले आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यावरील पुस्तकाचे विमोचन करतांना सोनिया गांधी यांनी विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, याचे संकेत दिले आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर ‘मल्लिकार्जुन खरगे : पॉलिटिकल एंगेजमेंट विथ कंपॅशन, जस्टिस अड इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट’ (Mallikarjun Kharge : Political Engagement with Compassion, Justice and Inclusive Development) या पुस्तकाचे सोनिया गांधी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. सोनिया गांधी यांनी या वेळी दिलेल्या भाषणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

(हेही वाचा – Winter Session 2023 : विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न; लक्षवेधी स्वीकारण्यास सुरुवात)

या वेळी केलेल्या भाषणात सोनिया यांनी खरगे यांचे निस्वार्थी राजकारणी असे वर्णन करत सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत ते देशातील सर्वांत जुन्या पक्षाचे नेतृत्व करण्यास सर्वतोपरी पात्र आहेत. त्यांच्या या वाक्यामुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव मागे पडून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची चर्चा चालू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.