‘इतर देशांवर अवलंबून असलेला भारत आज मोठी अर्थव्यवस्था बनलाय’; राष्ट्रपतींकडून कौतुक

85

जो भारत पूर्वी स्वत:च्या समस्यांसाठी इतर देशांवर अवलंबून होता, तोच भारत आता जगभरातील दुस-या देशांच्या समस्या सोडवू लागला आहे. आत्मनिर्भतेमुळे भारत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. देशाचे सरकार भारताला भ्रष्टाचारमुक्त बनवू पाहात आहे. भारताला त्याचबरोबर एकही गरीब व्यक्ती नसलेला देश बनवणे हे आपले ध्येय आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मंगळवारी त्यांच्या संसदेतील अभिभाषणात म्हणाल्या.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत अभिभाषण केले. यावेळी त्यांनी केंद्रातल्या विद्यमान मोदी सरकारचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच, आपला देश बदलत असल्याचे त्या म्हणाल्या. मुर्मू म्हणाल्या की, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे आता लोकांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. आपण ज्याची कामना करत होतो तो आधुनिक भारत आता घडू लागला आहे. देशात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर बनू लागले आहे.

( हेही वाचा: कोरोना काळातील घोटाळ्यासंदर्भात मनसेचे थेट ईडीला पत्र; ‘आमच्या हाती भक्कम पुरावे’, मनसेचा दावा )

जगाला हेवा वाटेल अशी भारताची वाटचाल

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, आयुष्यमान भारत योजनेने देशातील कोट्यावधी गरीबांचे कल्याण केले आहे. आगामी काळात एकही गरीब व्यक्ती नसलेला देश बनणे हेच आपले ध्येय असेल. भारत वैश्विक स्तरावर एक बलवान राष्ट्र बनू लागला आहे. आपल्या जागतिक भूमिका आत्मविश्वासाने पुढे नेणारे सरकार देशाला लाभले आहे. त्याचबरोबर देशात आपली भ्रष्ट्राचारासोबत निरंतर लढाई सुरु आहे, देशात भ्रष्टाचाराचे उच्चाटन सुरु आहे. जगाला हेवा वाटेल अशी वाटचाल देश करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.