पाकिस्तानातील राजकीय संकटात इम्रान खान यांना आठवला भारत!

113

पाकिस्तानातील राजकीय खळबळ उडाली असताना पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केले आहे. भारत हा अमेरिकेसोबत क्वाडचा भाग आहे, तरीही ते रशियाकडून तेल आयात करत आहेत, हे भारताचे परराष्ट्र धोरण आहे. मी आज भारताचे कौतुक करतो. त्यांनी नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठेवले आहे, असे इम्रान म्हणाले. ते पुढे म्हणाले, भारत आणि अमेरिका यांची मैत्री चांगली आहे आणि ते स्वतःला तटस्थ म्हणवतात. निर्बंध असतानाही भारत रशियाकडून तेल मागवत आहे. कारण भारताचे परराष्ट्र धोरण जनतेच्या भल्यासाठी आहे.

(हेही वाचा – उपायुक्त सौरभ त्रिपाठींच्या नोकराला ‘या’ प्रकरणात झाली अटक!)

पाकमध्ये राजकीय उलथापालथ

दरम्यान, पाकिस्तानमधील राजयकीय संकटात इम्रान खान सापडले असून त्यांना या संकटसमयी भारत देश आठवला आहे. पाकिस्तानचे राजकारण पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पाकिस्तानमध्ये आजपर्यंत एकाही पंतप्रधानाने आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही आणि आता इम्रान खान यांना सत्तेतून बेदखल करण्याची तयारी सुरू आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात पीपीपीचे सरकार

28 मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव होणार आहे. त्यांच्याच पक्षाचे अनेक खासदार त्यांच्या विरोधात असल्याने इम्रान या मतदानाला घाबरले असल्याचे सांगितले जात आहे. सिंध सरकारची मालमत्ता असलेले असंतुष्ट खासदार इस्लामाबादच्या सिंध हाऊसमध्ये राहत असून पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) द्वारे पाकचे सरकार चालवले जाते. तर पाकिस्तानच्या सिंध प्रांतात पीपीपीचे सरकार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.