G-20 Summit च्या आयोजनासाठी भारत सज्ज

संपूर्ण देश या परिषदेच्या यजमानपदासाठी सज्ज झाला आहे.

221
G-20 Summit च्या आयोजनासाठी भारत सज्ज
G-20 Summit च्या आयोजनासाठी भारत सज्ज

देशाची राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर ९ ते १० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जी-२० परिषदेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्ण देश या परिषदेच्या यजमानपदासाठी सज्ज झाला आहे. जी-२० शिखर परिषद पुढील महिन्यात दिल्लीत होणार आहे. या गटाचा भाग असलेल्या अनेक देशांचे नेते यात सहभागी होणार आहेत. भारत यंदा जी-२० चे अध्यक्षपद भूषवत आहे. भारताने या परिषदेची थीम ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ठेवली आहे.

दिल्लीतील कार्यालय तीन दिवस बंद राहणार आहे –

जी-२० परिषद निर्विघ्न संपन्न व्हावी यासाठी राजधानीतील केंद्र सरकार, राज्य सरकार, बँका, वित्तीय संस्था आणि खासगी कार्यालये ८ ते १० सप्टेंबर असे तीन दिवस बंद राहणार आहेत. दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या तीन दिवसांमध्ये शहरातील सर्व शैक्षणिक संस्था आणि सरकारी आणि खाजगी कार्यालये बंद राहतील.परिसरातील चार ते पाच किलोमीटर दरम्यान च्या घराच्या विंडो देखील उघडण्यास रहिवाशांना बंदी करण्यात आली आहे. तसेच किरकोळ विक्रेता वर देखील बंदी करण्यात आली आहे. यामुळे दिल्ली मध्ये कडक सुरक्षा दिसून येत आहे.

‘हे’ देश जी-२० चा भाग आहेत –

जी-२० हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा गट आहे. यात भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन या देशांचा समवेश आहे.

दरम्यान, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण कोरिया, फ्रान्स, चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या देशाचे प्रमुख या परिषदेला हजेरी लावणार आहेत.

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत येत आहेत. ते ७ ते १० सप्टेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर असतील. स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदलाशी लढा देणे, युक्रेन संघर्षाचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम कमी करणे यासह जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक संयुक्त प्रयत्नांवर चर्चा करतील.

यूके: पंतप्रधान ऋषी सुनक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यूके-भारत व्यापार चर्चेवर चर्चा करण्यासाठी सुनक भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठक घेणार असल्याची माहिती आहे.

दक्षिण कोरिया: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. भारतातील दक्षिण कोरियाचे राजदूत चांग जे बोक यांनी ही माहिती दिली.

फ्रान्स: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला येत आहेत. ते नवी दिल्लीतील क्लेरिज हॉटेलमध्ये राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

चीन : या शिखर परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही उपस्थित राहणार आहेत.

कॅनडा: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जी-२० शिखर परिषदेचा भाग असतील आणि जग युक्रेनच्या पाठीशी उभे राहील याची खात्री करून घेईल.

ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज हेही उपस्थित राहणार आहेत.

बांगलादेश: बांगलादेशचे उपउच्चायुक्त अंदलिब इलियास यांनी सोमवारी स्पष्ट केले की पंतप्रधान शेख हसीना जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मात्र, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून आपण या शिखर परिषदेचा भाग बनू शकणार नसल्याची माहिती दिली. या बैठकीत रशियाचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव करणार असल्याचे पुतीन यांनी सांगितले.

(हेही वाचा – Shri Ganesh Murti आगमन–विसर्जन मार्गांवरील खड्डे आठवडा भरात बुजवा!)

१६० उड्डाणे रद्द –

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या आणि जाणार्‍या किमान १६० देशांतर्गत उड्डाणे ८ ते १० सप्टेंबर दरम्यान आगामी जी-२० शिखर परिषदेमुळे राजधानीतील रहदारी निर्बंधांमुळे रद्द करण्यात आली आहेत, हे येथे उल्लेखनीय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.