Steel Sector : भारत-जपानमध्ये पोलाद क्षेत्रातील सहकार्य, कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर चर्चा

152
Steel Sector : भारत-जपानमध्ये पोलाद क्षेत्रातील सहकार्य, कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर चर्चा

केंद्रीय पोलाद (Steel Sector) मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि जपानचे अर्थ, व्यापार आणि उद्योग मंत्री निशिमुरा यासुतोशी यांच्यात गुरुवारी (२० जुलै) नवी दिल्ली येथे पोलाद क्षेत्रातील (Steel Sector) सहकार्य आणि कार्बन वापर कमी करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी द्विपक्षीय बैठक झाली.

पोलाद क्षेत्रातील (Steel Sector) आर्थिक वाढ आणि कमी कार्बन संक्रमण या दोन्ही बाबींचा पाठपुरावा करण्याच्या मूलभूत तत्त्वासह प्रत्येक देशाच्या उद्योगाची परिस्थिती लक्षात घेऊन धोरणात्मक दृष्टिकोन अवलंबण्याच्या महत्त्वावर दोन्ही देशांकडून भर देण्यात आला. भारत आणि जपान हे जगातील दुसरे आणि तिसरे सर्वात मोठे पोलाद उत्पादक तसेच जागतिक पोलाद उद्योगातील (Steel Sector) लाभात सह – भागीदार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

(हेही वाचा – Ashish Shelar : अनध‍िकृत शाळांची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा; आश‍िष शेलार यांची मागणी)

भारतात अलिकडेच जपानी पोलाद (Steel Sector) उत्पादकांनी केलेल्या गुंतवणुकीचा विस्तार ओळखून, दोन्ही देशांच्या सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमधील सहकार्याला पाठिंबा देण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला. यामुळे जागतिक पोलाद उद्योगाचा योग्य विकास होईल.

दोन्ही देशांनी पोलाद (Steel Sector) कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या मार्गांची विषमता ओळखून आपली निव्वळ शून्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहकार्य महत्त्वाचे असल्याचा पुनरुच्चार केला. हे सहकार्य सुरु ठेवण्यासाठी, पोलाद संवाद आणि इतर सहकार्यात्मक कार्यक्रमांद्वारे यापुढील चर्चा आयोजित करण्याचा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आला, ज्यामध्ये नोव्हेंबर, 2023 मध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्राच्या सहभागाने ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि स्टील उत्पादनाचे डीकार्बनायझेशन करण्याबाबत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर भर दिला जाईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.