Narendra Modi Ramtek : इंडि आघाडीवाले हिंदु धर्माच्या शक्तीलाही संपवू पहात आहेत; पंतप्रधानांनी उघड केली काँग्रेसची पापे

Narendra Modi Ramtek : ७०-७५ वर्षे बाबासाहेबांचे संविधान भारतात लागू झाले नव्हते. याला कोण जबाबदार आहे ? काँग्रेसने दहशतवाद आणि फुटीरतावादाला खत-पाणी देणारे ३७० चालू ठेवले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

191
Narendra Modi Ramtek : इंडि आघाडीवाले हिंदु धर्माच्या शक्तीलाही संपवू पहात आहेत; पंतप्रधानांनी उघड केली काँग्रेसची पापे
Narendra Modi Ramtek : इंडि आघाडीवाले हिंदु धर्माच्या शक्तीलाही संपवू पहात आहेत; पंतप्रधानांनी उघड केली काँग्रेसची पापे

इंडि आघाडी (India Alliance) ताकदवान झाले, तर देशाचे तुकडे-तुकडे करतील. ते आजही एका समाजाला दुसऱ्या समाजात लढवण्यासाठी कोणतीही कसर मागे सोडत नाहीत. सध्या नवरात्र चालू आहे. शक्तीच्या उपासनेचे पर्व आहे. हे लोक हिंदु धर्माच्या शक्तीला समाप्त करु इच्छित आहेत. अशा इंडिया आघाडीला महाराष्ट्रात एक तरी जागा जिंकू द्याल का ? त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली पाहिजे कि नाही ? त्यांना मतदानातून शिक्षा देणार कि नाही ? त्यांच्या पापांची शिक्षा त्यांनी मिळाली पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Ramtek) यांनी रामटेक येथे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारसभेत केले.

(हेही वाचा – Mumbai Hawkers : बोरीवलीतील एस व्ही रोडसह आता स्कायवॉकही फेरीवाल्यांना आंदण, सांगा लोकांनी चालायचे कुठून?)

संविधान एवढे महत्त्वाचे होते तर….

पंतप्रधान पुढे म्हणाले की, आपले एक एक मत यांनी जिंकवण्यासाठी तर आहेच, मात्र त्यांनी शिक्षा देण्यासाठीही आहे. काँग्रेसने (Congress) बाबासाहेब आंबेडकरांचे (Babasaheb Ambedkar) राजकारण संपवले. बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कारापासून वंचित ठेवले. संविधान एवढे महत्त्वाचे होते, ते संविधान पूर्ण हिंदुस्थानमध्ये लागू करण्याचे धाडस का केले नाही. ७०-७५ वर्षे बाबासाहेबांचे संविधान भारतात लागू झाले नव्हते. याला कोण जबाबदार आहे ? काँग्रेसने दहशतवाद आणि फुटीरतावादाला खत-पाणी देणारे ३७० चालू ठेवले. परिवारवादी पक्षांनी संविधानाच्या भावनेचा अपमान केला. हे स्वतःच्या परिवाराला पुढे नेण्यात व्यस्त आहेत.

काश्मीरविषयी फुटीरतावादी भाषा मंजूर आहे का ?

इंडि आघाडीचे लोक दक्षिण भारत वेगळा करू म्हणत आहेत. द्रमुकचे लोक सनातन धर्माला (Sanatana Dharma) डेंग्यू, मलेरिया म्हणत आहेत. अशा काँग्रेसच्या लोकांना महाराष्ट्रात आणून विरोधक त्यांच्यासोबत रॅली करतात. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटले आहे की, मोदी अन्य राज्यांत जाऊन काश्मीरचे कलम ३७० विषयी का सांगतात ? काश्मीरविषयी ही भाषा आपल्याला मंजूर आहे का ?, असा प्रश्न पंतप्रधानांनी (Narendra Modi Ramtek) या वेळी उपस्थित केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.