राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आयोजित केलेल्या मेजवानी कार्यक्रमात (india maldives conflict) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मालदीवचे (maldives) राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू (Mohammed Muizzou) आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्या शेजारी बसले होते. पंतप्रधान मोदींच्या शपथविधी समारंभासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या शेजारील देशांतील नेत्यांनी राष्ट्रपती भवनातील मेजवानीला हजेरी लावली होती. (india maldives conflict)
President Droupadi Murmu hosted a banquet at Rashtrapati Bhavan in honour of the leaders of neighbouring countries attending the swearing-in-ceremony of the Prime Minister of India. The leaders who attended the banquet include President Ranil Wickremesinghe of Sri Lanka;… pic.twitter.com/vo9jP8SdWp
— President of India (@rashtrapatibhvn) June 9, 2024
(हेही वाचा –Modi Cabinet : कुणाला मिळणार कुठलं खातं? उत्सुकता शिगेला)
काही महिन्यांपूर्वी भारत आणि मालदीव या दोन्ही देशांत शाब्दिक युद्ध (india maldives conflict) रंगले होते. मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवमधील काही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याने हे प्रकरण वाढलं होतं. त्यामुळे या दोन्ही देशांतील नातेसंबंध बिघडले होते. परंतु, मोदी पुन्हा एकदा सत्तेवर आल्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानी सोहळ्यालाही मुइज्जू हजर राहिले होते. (india maldives conflict)
(हेही वाचा –Modi 3.0: पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारताच मोदींचे शेतकऱ्यांना खास गिफ्ट!)
मालदीव आणि भारत यांच्यात वाद (india maldives conflict) सुरू झाल्यानंतर भारतातून मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही रोडावली होती. तसंच, काही वर्षांपूर्वी भारताने मालदीवला अनेकदा आर्थिक मदत केल्याने त्याचे ऋणही मालदीवर आहे. त्यामुळे या ऋणातून मुक्ती मिळावी यासाठी मालदीवकडून प्रयत्न सुरू होते. यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. (india maldives conflict)
(हेही वाचा –Suresh Gopi : भाजपाच्या केरळमधील खासदाराने वाढवली चिंता; काल शपथ, आता म्हणतात, मला पदमुक्त करा…)
या मेजवानी सोहळ्यात मुइझ्झू पंतप्रधान मोदींच्या डाव्या बाजूला बसले होते, तर श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे त्यांच्या उजव्या बाजूला बसले होते. त्यानंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल, पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीनंतर राष्ट्रपती मुइझ्झू यांनी भारतीय पंतप्रधानांसोबतच्या त्यांच्या भेटीचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. (india maldives conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community