रविवार ७ जानेवारी रोजी संध्याकाळी भारत आणि मालदीव (India Maldives conflict) या दोन देशांमध्ये वाद सुरु झाले. मालदीवच्या एका मंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख इस्त्रायलचे दूत असा केल्याची बातमी सगळीकडे पसरली. मालदीवच्या आणखी दोन मंत्र्यांनीही त्याला जोडून भारताविरुद्ध हिंदूविरोधी टिप्पणी केली.
(हेही वाचा – Parliament Security Breach : ललित झा नाही तर ‘हा’ आहे खरा मास्टरमाईंड)
काय आहे ‘बॉयकॉट मालदीव’ ट्रेंड ?
त्यानंतर भारतात ‘बॉयकॉट मालदीव’ (Boycott Maldives) हा ट्रेंड जोर धरू लागला. अनेक भारतीयांनी सोशल मीडियावर आपण आपली मालदीव सहल रद्द केल्याचे संदेश टाकायलाही सुरुवात केली. राजकीय पातळीवर तर दोन्ही देशांमध्ये (India Maldives conflict) बोलणी सुरू झालीच, शिवाय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मालदीवला जाण्याऐवजी भारतातील लक्षद्वीप सारख्या किनारपट्टीवर फिरायला जा असे सांगितले. योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो वायरल केले.
(हेही वाचा – Ayodhya : अयोध्येत उभारणार जगातील पहिले संपूर्ण शाकाहारी सप्त तारांकित हॉटेल)
मालदीव हा एक छोटासा देश –
अशातच आता मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू (India Maldives conflict) यांनी शनिवारी (१३ जानेवारी) एक विधान केले. मोहम्मद मुइझू म्हणाले की; “मालदीव हा एक छोटासा देश आहे, परंतु कोणालाही आम्हाला धमकावण्याचा, दाबण्याचा परवाना मिळालेला नाही.” मुइज्जू यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा भारताकडे होता, असं म्हटलं जात आहे. मालदीवच्या राष्ट्रपतींनी ही टिप्पणी त्यांच्या पाच दिवसांच्या चीन दौऱ्याच्या समाप्तीनंतर वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर (व्ही. आय. ए.) केली.
(हेही वाचा – Thane Municipality : स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी, २४व्या स्थानावर झेप)
चीनधार्जिणे मुइज्जू –
मुइज्जू हे चीनधार्जिणे आहेत हे सर्वाना माहित आहेच. अशातच भारतासोबत सुरु असलेल्या या वादादरम्यान मुइज्जू यांनी नुकतीच चीनवारी केली. यावेळी त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. एकीकडे भारताबरोबरचे संबंध ताणले (India Maldives conflict) गेले असताना मुइज्जू यांनी चीनचा दौऱ्या केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पाच दिवसीय चीन दौरा –
पाच दिवसीय चीन दौऱ्यावर असताना मोहम्मद मुइज्जू यांनी अनेक राजकीय भेटीगाठी केल्या. तसेच ते चीनच्या फुजियान प्रांतातील मालदीव बिझनेस फोरममध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी चीन हा मालदीवचा सर्वांत जवळचा मित्र आणि विकासातला भागीदार असल्याचं वक्तव्य केलं होतं. (India Maldives conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community