India–Pakistan border : सीमेलगतच्या रस्त्यांचा विकास होणार, २,२८० किमी लांबी, ४, ४०० कोटींचा निधी; मोदी सरकारचा मोठा निर्णय

72

पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा ही केंद्र सरकारसाठी नेहमीच चिंतेची बाब ठरत असते. अशातच केंद्र सरकारने पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या रस्त्यांची स्थिती सुधारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकाराने सीमेलगतच्या भागातील २ हजार २८० किमी लांबीच्या रस्त्यांच्या बांधकामाची प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी मोदी सरकारने (modi government) ४ हजार ४०० कोटींहून अधिकच्या निधीची तरतुद केली आहे.

( हेही वाचा : Garba Pass Scam : कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच बनवले गरब्याचे बनावट पास; सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे लाखो रुपयांचा गैरप्रकार उघडकीस

सीमेलगत बांधल्या जाणाऱ्या या रस्त्यांमुळे दळणवळण सुविधा सुलभ होणार आहे. तसेच आपातकालीन परिस्थितीत तिथे तत्काळ पोहचणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर सैनिकांसाठी आवश्यक वस्तू तातडीने पोहोचवणेही सोपे होईल. या योजनेमुळे पंजाब, राजस्थान या राज्यांना लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागातील रस्त्यांची व्यवस्था नीट केली जाईल. एवढेच नाही तर यामुळे सीमावर्ती भागातील दळवळण सुविधेला वेग प्राप्त होईल.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.