India – Canada तणाव वाढला; भारताने कॅनडातील दुतावासामधील उच्चायुक्तांसह अधिकाऱ्यांना बोलावले माघारी

91
Canada - India तणाव वाढला; भारताने कॅनडातील दुतावासामधील उच्चायुक्तांसह अधिकाऱ्यांना बोलावले माघारी
Canada - India तणाव वाढला; भारताने कॅनडातील दुतावासामधील उच्चायुक्तांसह अधिकाऱ्यांना बोलावले माघारी

हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या वादामुळे भारत आणि कॅनडाचे (Canada – India) संबंध बिघडले आहेत. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने दि. १४ ऑक्टोबर रोजी भारताने कॅनडातून (Canada – India) आपल्या उच्चायुक्तांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारताचे कॅनडामधील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि दूतावासातील इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Canada – India)

( हेही वाचा : चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अभिनेते Atul Parchure यांच्या निधनानंतर CM Eknath Shinde यांनी वाहिली श्रद्धाजंली

भारताने दि. १४ ऑक्टोबर रोजी कॅनडाचा एक ‘डिप्लोमॅटिक कम्युनिकेशन’ पूर्णपणे फेटाळत परखड उत्तरही दिले आहे. कॅनडाने या ‘डिप्लोमॅटिक कम्युनिकेशन’द्वारे आरोप केला की, “भारताचे कॅनडामधील (Canada – India) उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि दूतावासातील इतर अधिकारी जून २०२३ मध्ये झालेल्या खालिस्तान समर्थक नेता हरदीप सिंह निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्या प्रकरणात सहभागी होते.” भारतानं कॅनडाच्या या भूमिकेला विरोध करत, दिल्लीतील त्यांच्या मिशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहेत. तसेच कॅनडातील भारतीय उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांवरील बिनबुडाचे आरोप मान्य नसल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.(Canada – India)

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं याप्रकरणावर म्हटले की, “कॅनडातील ट्रुडो सरकारच्या भूमिकेमुळं भारतीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेला धोका आहे. त्यामुळे त्याच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही. यामुळेच भारत सरकारने कॅनडातून उच्चायुक्तांसह अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्या प्रकरणात भारतीय उच्चायुक्तांचं नाव घेतल्यानं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो सध्या अनेक आव्हानांचा सामना करत असल्यानं, हा मुद्दा आता आता राजकारणाशी जोडला गेला आहे, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.(Canada – India)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.