भारताने Pakistan ला खडसावले; म्हणाले, दहशतवादाचा खरा केंद्रबिंदू कुठे आहे, हे जगाला ठाऊक…

31
भारताने Pakistan ला खडसावले; म्हणाले, दहशतवादाचा खरा केंद्रबिंदू कुठे आहे, हे जगाला ठाऊक...
भारताने Pakistan ला खडसावले; म्हणाले, दहशतवादाचा खरा केंद्रबिंदू कुठे आहे, हे जगाला ठाऊक...

पाकिस्तानमधील (Pakistan) पेशावरच्या दिशेने जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसला हायजॅक करून दहशतवाद्यांनी प्रवाशांना ओलीस ठेवल्याची घटना नुकतीच घडली. जवळपास ४४० प्रवासी दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. यापैकी २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून उर्वरित प्रवाशांची सुटका करण्यात पाकिस्तान (Pakistan) लष्कराला यश मिळालं. मात्र, या हल्ल्यावरून पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले होते आहेत. पाकिस्तानने (Pakistan) भारतावर दहशतवादी (Terrorism) कारवायांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. भारताने हा आरोप फेटाळून लावत दि. १४ मार्च रोजी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. दहशतवादाचा (Terrorism) खरा केंद्रबिंदू कुठे आहे, हे जगाला ठाऊक असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानला खडसावले आहे.

( हेही वाचा : पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध; Prakash Abitkar यांचे प्रतिपादन

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) म्हणाले की, पाकिस्तानने केलेले बिनबुडाचे आरोप आम्ही जोरदारपणे फेटाळतो. जगातील दहशतवादाचा (Terrorism) केंद्रबिंदू कुठे आहे? हे संपूर्ण जगाला माहिती आहे. पाकिस्तानने दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा तसेच स्वतःच्या अंतर्गत समस्या आणि अपयशांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याऐवजी स्वतः आत डोकावून पाहावे असे जयस्वाल यांनी सुनावले.

नैॠत्य पाकिस्तानमधील (Pakistan) बलुच बंडखोरांनी दि. ११ मार्च रोजी जाफर एक्सप्रेसवर (Jaffer Express) हल्ला केला होता. ही रेल्वेगाडी ताब्यात घेत त्यातील 214 जणांना सुमारे 24 तास ओलीस ठेवले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून (Pakistan) भारतावर दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला. पाकिस्तानने अनेकदा भारतावर बलुच फुटीरतावादी गटांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. पण यावेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान (Shafqat Ali Khan) यांनी या हल्ल्यामागे अफगाणिस्तानचा (Afghanistan) हात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी सांगितले की या प्रकरणी फोन कॉलद्वारे अफगाणिस्तानशी संपर्क साधल्याचे पुरावे आहेत असे खान यांनी म्हंटले होते.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.