भारत-रशिया AK-203 करारावर स्वाक्षरी! दिल्ली दौऱ्यात पुतिन-मोदींची पहिली भेट

114

MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 21 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. यावेळी दोघे नवी दिल्लीला अधिकृत भेट देतील. यासह नोव्हेंबर 2019 मध्ये ब्राझिलिया येथे झालेल्या BRICS शिखर परिषदेदरम्यान झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली थेट भेट असणार आहे. अलीकडच्या भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या दोन प्रमुख नेत्यांमधील बैठक जागतिक पातळीवर महत्त्वाची मानली जात असून साऱ्यांच या दोघांच्या भेटीकडे लक्ष लागून आहे.

AK-203 करारावर होणार स्वाक्षरी?

G20, BRICS आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमधील संयुक्त कार्याचा समावेश असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विषयांवर मोदी आणि पुतिन यांची चर्चा होईल. दरम्यान, भारत आणि रशिया यांच्यातील लष्करी संबंधांना मोठी चालना मिळणार आहे. व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्ली भेटीदरम्यान 7.5 लाख AK-203 असॉल्ट रायफल्सचा पुरवठा करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये करार करण्यात येणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – २०२४मध्ये भाजपाला पर्याय देण्यावर शरद पवार-ममता बॅनर्जींमध्ये चर्चा)

भविष्यातील द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा

रशिया-भारत-चीन यांच्यात नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय बैठकीनंतर पुतिन यांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कोरोना महामारीनंतर पुतिन पहिल्यांदाच या द्विपक्षीय बैठकीसाठी जाणार आहे. यावेळी दोन्ही देशांमधील भविष्यातील द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.